CBSE 10th Exam Results: दहावीचा निकाल जाहीर, कधी आणि कसे मिळेल मार्कशीट?

दहावीचा निकाल जाहीर, कधी आणि कसे मिळेल मार्कशीट? l CBSE class 10th Term 1 results announced here get marksheet Class X marksheet
दहावीचा निकाल जाहीर, कधी आणि कसे मिळेल मार्कशीट? l CBSE class 10th Term 1 results announced here get marksheet Class X marksheet
Share on Social Sites

नवी दिल्ली l New Delhi :

CBSE बोर्डाने दहावीच्या Term 1 चे निकाल जाहीर केले आहेत. CBSE (Central Board of Secondary Education) बोर्डाच्या शाळांकडे निकाल सोपवण्यात आले आहेत. निकाल आल्याचे जाहीर झालेले असले तरी विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप मार्कशीट पडलेली नाही.

फक्त किती गुण मिळाले तो आकडा जाहीर झालेला आहे. CBSE ने या वेळी दहावीची परीक्षा दोन सत्रांत घ्यायचा निर्णय घेतला होता. त्यातल्या पहिल्या सत्राचा (CBSE class 10th term 1 results out) हा निकाल आहे. काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 100 टक्के गुण मिळाले आहे. आणि एकदी विद्यार्थी नापास झालेला नाही.

MPSC परीक्षा वेळापत्रक 2022 (सुधारित) जारी, ‘येथे’ पाहा परीक्षेच्या नवीन तारखा

CBSE बोर्डाने निकाल शाळांकडे सोपवले असल्याची माहिती दिली आहे. आता शाळा आपापल्या पातळीवर गुणपडताळणी करून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटप करतील किंव ऑनलाइन जाहीर करतील. देशभरातल्या काही शाळांनी गुणपत्रिका द्यायला सुरुवातही केली आहे.

CBSE term 1 चे दहावीचे निकाल शाळांकडे सुपूर्द केले आहेत. शाळांकडे यापूर्वीच प्रॅक्टिकल (Practical) आणि इंटर्नल असेसमेंटचे (Internal Assessment) निकाल आलेले आहेत. आज थिअरी पेपर्सचे (Theory Papers) गुण कळवण्यात आले. आता शाळा हा निकाल एकत्र करून गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देतील. याविषयी अधिक माहिती बोर्डाच्या वेबसाइटवरआहे.

100 टक्के निकाल 100% गुण

CBSE Class X term 1 Exam मध्ये एकही विद्यार्थी नापास झालेला नाही. याचा अर्थ पहिल्या सत्राचा निकाल 100 टक्के लागला आहे. आता या वर्षीचा निकाल दुसऱ्या सत्राची परीक्षा झाल्यानंतरच किती तो कळेल. गेल्या वर्षी Covid-19 च्या साथीमुळे परीक्षा ऑफलाइन स्वरूपात झालेली नव्हती आणि इंटर्नल अससेसमेंट (Internal Assessment) आणि गेल्या वर्षीपर्यंतची विद्यार्थ्यांची कामगिरी यावरूनच दहावीचे गुण देण्यात आले होते. त्यानुसार गेल्या वर्षी CBSE बोर्डाचा दहावीचा निकाल 99.57 percent लागला होता.

या वर्षी दोन सत्रांत परीक्षा घ्यायचा निर्णय झाला होता. दुसऱ्या सत्राची परीक्षा एप्रिल-मे मध्ये होणार आहे. म्हणजे यंदापासून CBSE च्या विद्यार्थ्यांना दोन वेळा बोर्डाची परीक्षा द्यावी लागेल.

Good News : होय! आता कोणत्याही वयात व्हा ‘डॉक्टर’; सविस्तर वाचा

See also  सैराटची पुनरावृत्ती, आधी मुलीच्या वडिलांनी धमकावलं, योगेशला अज्ञातांनी भोसकलं

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  खळबळजनक! शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशीतैशी; चक्क शौचालयात धुतली जाताहेत जेवणाची भांडी : पाहा VIDEO

Share on Social Sites