
घोटी l Ghoti :
जिल्ह्यातील घोटीतील बालरोगतज्ञ डॉ. सुनील बुळे (Pediatrician Dr. Sunil Bule) यांच्या श्रीरामवाडी (Shriramwadi) येथील घरात रविवारी (दि. २३) मध्यरात्री तलवारीचा धाक दाखवून दोघांनी लूटमार केल्याची घटना घडली आहे. यामुळे धक्कादायक घटनेमुळे घोटीत एकच खळबळ उडाली असून डॉक्टरांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीरामवाडीतील डॉ. बुळे रात्री दोन वाजेच्या सुमारास सइमर्जन्सी रुग्ण तपासण्यासाठी घराला बाहेरुन कुलूप लाऊन गेले होते. यावेळी त्यांची पत्नी डॉ. सविता घरात एकट्याच होत्या. याचाच फायदा घेऊन दोघांनी आजुबाजुच्या घरांना कडी लावत बुळे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
Nashik Crime : दोन वेटर्समधील वादाचे तुफान हाणामारीत रूपांतर; हॉटेलमध्ये एकाचा मृत्यू
डॉ. सविता बुळे यांना तलवारीचा धाक दाखवत सोन्याची चेन, सोन्याची अंगठी, मणिमंगळसूत्र व ४० हजार रुपये असा दोन लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला. या घटनेचा वैद्यकीय संघटनेसह (Medical Association) घोटी ग्रामस्थांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.
कार पुलावरून कोसळून भीषण अपघात; आमदारपुत्रासह ७ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू