‘यांनी मशिदीचे भोंगे नाही काढले तर…’; राज ठाकरेंचा थेट इशारा : वाचा भाषणातील ठळक मुद्दे

'मशिदीचे भोंगे नाही काढले तर…'; राज ठाकरेंचा थेट इशारा : वाचा भाषणातील ठळक मुद्दे l Raj Thackeray LIVE MNS Gudipadva Melava 2022 LIVE
'मशिदीचे भोंगे नाही काढले तर…'; राज ठाकरेंचा थेट इशारा : वाचा भाषणातील ठळक मुद्दे l Raj Thackeray LIVE MNS Gudipadva Melava 2022 LIVE
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर मनसेचा गुढीपाडवा मेळावा (MNS Gudhipadva LIVE) मुंबईतील छ. शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे पार पडला आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे शिवाजी पार्कवरील भाषण ऐकण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते राज्य भरातून जमा झाले होते, यामध्ये ग्रामीण भागातील कार्यकर्ते संख्या लक्षणीय होती. दरम्यान, तब्बल दोन वर्षांनंतर राज ठाकरे एवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मंचावर बोलले आहे. (Raj Thackeray LIVE)

  • आज कार्यकर्त्यांचे दर्शन घेऊन आनंद वाटला

  • कोरोनाचा काळ आठवून आनंदही वाटतो आणि त्रासही होतो.

  • आज गजबजलेले शिवतीर्थ कोरोनाकाळात सामसुम होतं.

  • या काळात संपूर्ण जग सामसुम होतं.

  • या काळात पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी केली. 

  • या दोन वर्षात खूप काही बोलायचे राहून गेलं 

https://twitter.com/01mohite/status/1510282205335293955

  • निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार झाला.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.

  • अमित शहा म्हणाले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.

  • निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार झाला. 

  • राज ठाकरे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

  • माध्यमांची पकपक सुरू होते, दररोज नव्या बातम्यांचा भडिमार

  • मतदारांच्या स्मरणशक्तीचा शिवसेनेने गैरफायदा घेतला.

  • छगन भुजबळ दोन ते अडीच वर्ष तुरुंगात होते, त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 

  • दाऊदची संबंध असलेल्या नवाब मलिक यांना मंत्रिपद, मतदारांचा वापर मेंढपाळासारखा

  • लोकशाही कशी असते हे इंग्लंडकडे पहा

  • महाराष्ट्राची परंपरा आपण विसरून गेलो- राज ठाकरे 

  • जो जो माणून इतिहास विसरला त्याच्या पायाखालील भुगोल हरवला.

  • योगींच्या राज्यात उत्तर प्रदेशमध्ये विकास होत आहे, राज ठाकरे यांच्याकडून भाजपची प्रशंसा

  • राज्यात आजही शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत.

  • राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरू झाले.

  • शरद पवारांना जातीचे राजकारण हवंय

  • बाबासाहेब पुरंदेर यांना सॉफ्ट टार्गेट करण्यात आले.

  • आम्ही जातीतून बाहेर नाही पडलो आम्ही काय हिंदू होणार?

  • जातींमधून बाहेर या तरच हिंदुत्वाचा ध्वज हाती घेता येईल.

  • प्रत्येक राज्याने आपापली संस्कृती जपल्यास हा देश मोठा होणार आणि त्यातून हिंदू मोठा होणार.

  • ज्यांनी काम नाही केले, त्यांना सत्तेवर बसवले, ज्यांनी काम केले त्यांना सत्तेबाहेर काढले. 

  • १९९५ मध्ये फुकट घर मिळणार या उद्देशाने लोंढे वाढले.

  • बाळासाहेब ठाकरे यांचा उद्देश चांगला होता.

  • आमदारांना घरे देण्यास मनसे आमदार राजु पाटील यांनी विरोध केला.

  • आमदार, खासदारांना मिळणारी पेंशन बंद झाली पाहिजे

  • शिवसेना नेता यशवंत जाधव यांच्या घरात धाड पडली, दोन दिवस काय मोजत होते?

  • ज्या मशीदींसमोरील भोंगे निघत नाहीत तिथे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावा 

  • सत्ताधार्‍यांसमोर लोटांगण घालणारा समाज नको, मला अरेला कारे म्हणणारे लोक हवेत.

  • बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे स्मारक बांधा

  • तुम्हाला बंगला आवडला म्हणून नावावर करुन घेऊन नका

  • मदरशांवर एक धाड टाका

  • शिवजयंती साजरी केली तशीच १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीही जयंती साजरी करा

See also  Today’s Horoscope : 'असा' असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन, सोमवार, दि. 05 सप्टेंबर 2022

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  सभागृहातच सत्ताधारी-विरोधकांची तुफान फटकेबाजी; पाहा कोण काय-काय म्हणतंय ?

Share on Social Sites