![Kelva beach student drown दुर्दैवी! जिल्ह्यातील ३ विद्यार्थ्यांसह चौघांचा बीचवर बुडून मृत्यू; पोहत असलेल्या स्थानिक मुलांना वाचवताना काळाचा घाला l Four drowned along with 3 students in Kelva beach Nashik Maharashtra](https://ekhabarbat.com/wp-content/uploads/2022/03/Kelva-beach-student-drown-678x381.jpg)
नाशिक l Nashik :
पालघरमधील केळवा बीचवर (Kelva Beach, Palghar) पोहताना बुडत असलेल्या स्थानिक मुलांना वाचवताना सहलीसाठी गेलेल्या मूळ नांदगावच्या (Nandgaon) तर सध्या नाशकात जेईई- नीट परीक्षेची (JEE-NEET exam) तयारी करत असलेल्या एका खासगी क्लासच्या तिघांसह चौघांचा बुडून मृत्यू झाला. तिघांचे मृतदेह सापडले असून एकाचा मृतदेह उशीरापर्यंत हाती आला नव्हता.
कृष्णा शेलार (१७), दीपक चिंधू वडक्ते (१८), ओम विसपुते (१७) या नाशिकमध्ये शिकत असलेल्या नांदगावच्या तिघांसह स्थानिक रहिवासी अथर्व नाकरे (१३, रा. देवीपाडा, केळवे) याचा बुडून मृत्यू झाला आहे. माहीमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (Mahim Primary Health Center) शवविच्छेदन करण्यात आले.
Video : खळबळजनक! ‘रशियन सैनिक भारतीय मुलींना घेऊन गेलेत’, विद्यार्थिनीची आपबीती
पालघर पाेलिसांच्या (Palghar Police) माहितीनुसार, नाशिकच्या अशोक स्तंभ येथील कॉन्कर अकॅडमीच्या (Conquer Academy) ११ विद्यार्थिनी व २२ विद्यार्थी बीचवर ट्रॅव्हल बसने (MH 15, EF 1515) सहलीसाठी आले होते. विद्यार्थ्यांसमवेत क्लासचे सहा शिक्षकही हाेते. देवीपाडा (Devipada) येथील पाच स्थानिक अल्पवयीन मुले दुपारी दीडच्या सुमारास बीचवर पोहत होती.
मात्र, समुद्राला भरती आल्याने ती बुडू लागली. त्यावेळी नाशकातील विद्यार्थ्यांमधील चौघांनी बुडणाऱ्या मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या.
मात्र, पाणी वाढत असल्याने त्यांना खाेलीचा अंदाज आला नाही व ते वाहून गेले. स्थानिक जीवरक्षकांना स्थानिक चार मुलांसह नाशिकच्या अखिलेश देवरे (रा. नाशिक) याला वाचविण्यात यश आले. ओम वीसपुतेच्या पश्चात आई, वडील व एक बहिण, कृष्णा शेलारच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे. कृष्णाच्या वडीलांचे ट्रँक्टरचे गँरेज आहे.
दीपक वडक्ते (रा. खादगाव, ता. नांदगाव) याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ आणि तीन बहिणी असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच वडक्ते कुटुंबीय घटनास्थळी रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
ड्रग्स केसमध्ये आर्यन खानला ‘क्लीन चिट’ नाही; NCB ने तपासाबाबत दिली ‘ही’ माहिती
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
मध्य प्रदेशात OBC आरक्षणाचा मार्ग मोकळा; 'सुप्रीम' निर्णयाचा महाराष्ट्रालाही फाय...
Today’s Horoscope : 'असा' असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन,...
राज्यात निवडणुकांचा बिगुल पावसाळ्यानंतर?; मविआला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता
Mohali MMS Leaked : असे बनवले गेले 'ते' व्हिडीओ?; समोर आल्या 'त्या' वॉशरूममधील त...