मोठा कट उधळला! महाराष्ट्राकडे स्फोटकांसह निघालेले 4 खलिस्तानी दहशतवादी अटकेत

मोठा कट उधळला! महाराष्ट्राकडे स्फोटकांसह निघालेले 4 खलिस्तानी दहशतवादी अटकेत l 4 ‘Khalistani’ terrorists arrested in Haryana’s Karnal received weapons via drones
मोठा कट उधळला! महाराष्ट्राकडे स्फोटकांसह निघालेले 4 खलिस्तानी दहशतवादी अटकेत l 4 ‘Khalistani’ terrorists arrested in Haryana’s Karnal received weapons via drones
Share on Social Sites

नवी दिल्ली l New Delhi :

हरियाणातील (Haryana) कर्नालमध्ये (Karnal) चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. चार संशयित दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात हत्यारं, स्फोटक ताब्यात घेण्यात आली आहेत. संशयित दहशतवादी हरिवंदर सिंह रिड्डा (Harvinder Singh Ridda) यांच्याशी संबंधित असल्याीची माहिती आहे. (Four suspected terrorists arrested from Karnal, huge amount of explosives recovered)

महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट?, धुळ्यात चौघांकडून तब्बल 89 तलवारी, 1 खंजीर जप्त

अटक करण्यात आलेल्या संशयितांची गुप्तचर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांची पथकं देखील याबाबत चौकशी करत आहेत. चार संशयित पंजाबमधून (Punjab) महाराष्ट्रातील (Maharashtra) नांदेडमध्ये (Nanded) निघाले होते, अशी माहिती समोर आली आहे.

राज्यात चाललंय तरी काय?… धुळ्यानंतर आता ‘या’ ठिकाणी मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा जप्त; महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे कारस्थान?

बसताड़ा टोल नाक्यावर (Bastara toll plaza) चार जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीपासून कर्नाल 118 किमी अंतरावर आहे. पोलीसांच्या माहितीनुसार, चार संशयित दहशतवादी मोठी घटना घडवण्याच्या बेतात होते. पोलिसांच्या माहितीनुसार तीन व्यक्ती पंजाबच्या फिरोजपूरमधील (Ferozepur, Punjab) आहेत. तर, चौथा व्यक्ती लुधियानामधील (Ludhiana) आहे. चौघे इनोव्हा गाडीतून (Innova Car) दिल्ली मार्गे महाराष्ट्रतील (Maharashtra) नांदेडकडे निघाले होते.

सावधान! कोरोनानंतर भारतात आता ‘शिगेला’चे थैमान; 58 रुग्ण, एकाचा मृत्यू

सुरक्षा यंत्रणांच्या प्राथमिक अंदाजानुसार संशयितांचा पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेशी (Pakistan terrorist organization) संबंध असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आयबी (IB) आणि पोलीसांनी केलेल्या आतापर्यंतच्या चौकशीनुसार या घटनेमागं पाकिस्तानचा संबंध असल्याची माहिती समोर येत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बब्बर खालसाच्या (Babbar Khalsa) संशयित दहशतवाद्यांना पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून शस्त्र पुरवण्यात आली होती. पाकिस्तानातील दहशतवादी हविरंदर सिंह रिंडा याच्याशी चौघांचा संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. बॉम्ब निकामी करणारं पथक मिळालेल्या स्फोटकांना निष्क्रीय केले आहे.

आयबीच्या अलर्टनुसार बसताडा टोलनाक्यावर नाकेबंदी करण्यात आली होती. आजूबाजूच्या जिल्ह्यांतील सुरक्षा यंत्रणांना देखील अलर्ट करण्यात आलं होतं. कर्नालमध्ये नाकेबंदी करण्यात आली होती. त्या टोलनाक्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. सुरक्षा यंत्रणाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित दहशतवादी हे बब्बर खालसा संघटनेशी संबंधित आहेत.

इनोव्हा गाडीतून तीन भूसुरुंग, बंदूक आणि 31 काडतूस जप्त करण्यात आली आहेत. संशयित दहशतवादी हे पंजाबमधून दिल्लीकडे (Punjab To Delhi) जाणार होते आणि तिथून महाराष्ट्रातील नांदेडमध्ये येणार होते. गेल्या आठवड्यात पटियालामध्ये उफाळलेल्या हिंसाचारानंतर पोलीस आणि सुरक्षा दल सतर्क झाले होते.

See also  ...तर अशा शाळांची मान्यता रद्द होणार; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  How to Remove Odor From Shoes : पावसाळ्यात बुटांचा कुबट वास येतो? जाणून घ्या 'हे' 5 उपाय, दुर्गंधी होईल गायब

Share on Social Sites