
न्यूयॉर्क l New York :
अमेरिकेतील टेक्सास (Texas, US) मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टेक्सासमधील एका शाळेत माथेफिरूने अंदाधुंद गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एकूण 21 जणांचा मृत्यू झाला आहे. एका 18 वर्षीय तरुणाने हा गोळीबार केला असल्याची माहिती आहे. आतापर्यंत समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, मृतकांमध्ये 7 ते 10 वयोगटातील मुलांचा समावेश आहे. ही सर्व मुले ग्रेड 2, 3 आणि 4 चे विद्यार्थी होते. (Firing in Texas School)
अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित हल्लेखोरालाही मारण्यात आले आहे. या गोळीबारात मृतकांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.
US President Joe Biden spoke with Texas Governor Greg Abbott to offer any and all assistance he needs in the wake of shooting at Robb Elementary School in Uvalde, TX which killed 14 students and 1 teacher. pic.twitter.com/EcQXmVRqIm
— ANI (@ANI) May 24, 2022
AFP या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बंदुकधारी तरुण टेक्सासमधील रॉब एलिमेंट्री स्कूलमध्ये (Robb Elementary School) हँडगन आणि रायफल घेऊन शिरला. हल्लेखोर हा सॅन अँटोनियो (San Antonio) येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी काराइन जीन-पियरे (White House Press Secretary Carine Jean-Pierre) यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (President Joe Biden) यांना या घटनेबाबत कळवण्यात आलं आहे. राष्ट्राध्यक्ष बायडेन हे पाच दिवसीय आशिया दौऱ्यावरुन परतत आहेत.
Bitter truth #Texas #Uvalde pic.twitter.com/5RSiPsGkhO
— Malaprade (@rosiefriedhair) May 25, 2022
सीएनएनच्या वृत्तानुसार, या कथित हल्लेखोराने शाळेत गोळीबार करण्यापूर्वी त्याच्या आजीवर गोळ्या झाडून ठार केलं. त्यानंतर त्याने शाळेत अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर जो बायडेन यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.
Just another day in the USA…😠 #Texas #Uvalde #RobbElementary pic.twitter.com/AOvGTu9wXb
— STAND WITH UKRAINE 🇺🇦 (@CVorhees1970) May 24, 2022
वारंवार घडत आहेत घटना
अमेरिकन मीडियानुसार, 2022 मध्ये आतापर्यंत 30 शाळांमध्ये गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत 30 हून अधिक जणांचा या गोळीबाराच्या घटनेत मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
हुबळीमध्ये भीषण अपघात : 8 जण जागीच ठार, 28 जखमी; मृतांमध्ये 6 महाराष्ट्रातले
फेब्रुवारी 2018 मध्ये पार्कलँड, फ्लोरिडा येथील मार्जोरी स्टोनमॅन डगलस हायस्कूलमध्ये (Marjorie Stoneman Douglas High School in Parkland, Florida) झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतरची ही टेक्सासमधील सर्वात मोठी घटना आहे. त्यावेळी 18 जणांना टार्गेट करण्यात आलं होतं. 2012 या वर्षी न्यूटाऊन येथील कनेक्टिकट एलिमेंट्री स्कूलमध्ये (Connecticut elementary school in Newtown) एका बंदूकधाऱ्याने 26 जणांची हत्या केली होती.
Damini App : आता पंधरा मिनिटेआधी कळणार, वीज कुठे पडणार, ‘दामिनी अॅप’ देणार अलर्ट