तुमच्या घरात Cooler असेल तर सावधान; ‘या’ 5 वर्षांच्या मुलाबद्दल वाचाल तर डोळ्यातून येतील अश्रू
पुणे l Pune :
कधी कोणाला कशाचा मोह किती महागात पडले हे काही सांगता येत नाही. पुण्यात असाच एक प्रकार समोर आला आहे. चक्क ‘प्ले बॉय’ (Play Boy) होण्याच्या नादात एका तरुणाने एक नाही दोन नाही तर तब्बल 17 लाख 38 हजार रुपये गमावले आहेत. शेवटी तेलही गेलं अन् तूपही गेलं अशी या तरुणाची अवस्था झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा उच्चशिक्षित असून त्याचे बीएस्सी (BSc) पर्यंतचे शिक्षण झाले आहे. सध्या तो बेरोजगार आहे. मुळचा तो सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील असून, वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने पुण्यात वास्तव्यास आहे.
College Reopen : ठरलं! राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा गजबजणार
गेल्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. वडिलांचे निवृत्तीवेतन मिळाले होते. तेच पैसे आई सोबत खोटे बोलून शेअर मार्केट (Share Market) व इतर ठिकाणी गुंतवणूक करतो असे सांगून त्याने सायबर चोरट्यांच्या हवाली केल्याचे समोर आले आहे.
दि. 25 जुलै 2021 रोजी फिर्यादी तरुणाला त्याच्या फेसबुकवर प्ले बॉय कंपनीचे लायसन्स (Play Boy License) काढण्यासाठी तसेच मेंबर होण्यासाठी इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिसेस (Indian Escort Services) या संकेतस्थळावर नोंदणी करा अशी जाहिरात दिसली होती. तसेच एक ते दोन तासांत अडीच ते तीन हजार रुपये कमवा असे प्रलोभनदेखील दाखविण्यात आले होते.
सायबर चोरट्याच्या आमिषाला बळी पडून फिर्यादी तरुणाने दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी केली होती. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरुणाला त्यांच्या जाळ्यात खेचून परवाना फी, खोली भाडे, पोलिस पडताळणी, पिकअप ड्रॉप, लेट फी, पॉलिसीची रक्कम व त्याची लेट फी अशी विविध कारणे सांगून वेळोवेळी 17 लाख 38 हजार 822 रुपये भरण्यास सांगितले.
वडिलांच्या सेवानिवृत्तीचा पैसा यामध्ये त्याने लावला आणि तो ‘इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या (Indian Escort Service) भुलभुलैयात गमावला आहे. (Play Boy Job Fraud). फेसबुकवरुन प्ले बॉय कंपनीचं लायसन (Playboy Company License) काढण्यासाठी आणि मेंबर होण्यासाठी ‘इंडियन एस्कॉर्ट सर्व्हिस’चे ऑनलाईन मेंबर होण्यासाठी त्याने रजिस्ट्रेशन केले होते.
चिंता वाढली! भारतात Corona च्या नव्या व्हेरिअंटची एन्ट्री, मुंबईत XE आणि कप्पाची पहिली केस