१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला अखेर अटक

१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला अखेर अटक l Breaking News 1993 Mumbai Blast Abu Bakar arrested UAE
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मोस्ट वाँटेड आरोपीला अखेर अटक l Breaking News 1993 Mumbai Blast Abu Bakar arrested UAE
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

परदेशातील एका मोठ्या ऑपरेशनमध्ये भारतीय एजेन्सीला (Indian Agencies) मोठे यश आले असल्याचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. १९९३ साली झालेल्या मुंबई बॉम्ब स्फोटाचील मोस्ट वॉन्टेड आरोपी असलेला दहशतवादी अबू बकरला (Most Wanted terrorist Abu Bakar arrested in UAE) यूएईतून अटक करण्यात आली आहे.

१९९३ साली मुंबईतील (1993 Mumbai Serial Bomb Blast) वेगवेगळ्या ठिकाणी १२ साखळी बॉम्ब स्फोट (12 chain bomb blast) घडवण्यात आले होते. तब्बल २५७ लोक या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले होते, तर ७०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले होते.

Dearness Allowance Hike : आनंदवार्ता आलीच; केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात बंपर वाढ

तब्बल २९ वर्षानंतर अबू बकर (Abu Bakar) नावाचा मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी भारतीय यंत्रणांच्या हाती लागला असल्याची माहिती आहे. अबू बकर हा पाकव्याप्त काश्मिरात (Pakistan-occupied Kashmir POK) शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचे प्रशिक्षण देत असल्याचा संशय व्यक्त केला जात होते.

मुंबई हल्ल्यात वापरण्यात आलेले आरडीएक्सचे लॅन्डिंग (RDX landing) आणि दाऊद सोबत (Daub) दुबईतून (Dubai) कट रचण्यात बकरचा हात असल्यामुळे भारतीय यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. अखेर एका मोठ्या ऑपरेशननंतर अबू बकरला पकडण्यात भारतीय यंत्रणांना यश आले असल्याचे वृत्त हाती येत आहे.

दुःखद : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

१९९३ च्या बॉम्बस्फोटाचा अबू बकर हा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. तो यूएई आणि पाकिस्तानात राहत होता. यूएईमधील भारतीय एजन्सीच्या (Indian Intelligence Agency) माहितीनुसार त्याला नुकतच पकडण्यात आल्याचे माहिती आहे. २०१९ मध्ये खरंतर बकरला अटकही करण्यात आली होती.

मात्र काही कागदपत्रांच्या अडचणींमुळे तो यूएई अधिकाऱ्यांच्या ताब्यातून सटकण्यात यशस्वी झाला होता. अखेर आता त्याला पुन्हा एकदा अटक करण्यात आली असून लवकरच भारतात आणले जाणार असल्याचे वृत्त हाती येत आहे. इंडिया टुडेच्या सूत्रांनी याबाबतचे वृत्त दिले असून भारतीय यंत्रणांच्या कामगिरीला मोठे यश आले असल्याचा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

नाट्यमय घडामाेडींनंतर OBC आरक्षण विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी; तिढा सुटण्याची चिन्हे

कोण आहे अबू बकर? (Who is Abu Bakar?)

अबू बकर यांचे पूर्ण नाव अबू अब्दुल गफूर शेख (Abu Abdul Gafoor Sheikh) आहे. अबू हा दाऊद इब्राहिमचा (Dawood Ibrahim) अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखला जातो. दाऊदचे प्रमुख लेफ्टनंट मोहम्मद (Dawood’s chief Lieutenant Mohammed) आणि मुस्तफा डोसा (Mustafa Dosa) यांच्यासोबत अबू तस्करीत सामील होता. त्याने आखाती देशांमधून सोने, कपडे आणि इलेक्रॉनिक्स वस्तूंची तस्करी मुंबईत केल्याचा आरोप आहे. १९९७ मध्ये त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही (Red Corner Notice) जारी करण्यात आली होती. अबूने दुबईतीलच एका इराणी मुलीशी लग्न केले आहे. अबू बकरचे दुबईतील अनेक व्यावसायिकांशी हितसंबंध असल्याचेही सांगितले जाते. सध्या अबूच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु आहे.

१९९३ हल्ल्याच्या कटू आठवणी (Bitter memories of the 1993 attack)

१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटात तब्बल २५७ लोकांची जीव गेला होता. तर ७१३ गंभीरीत्या जखमी झाले होते. या दहशतवादी हल्ल्यात मुंबईतील (Mumbai Terrorist Attack) एकूण २७ कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. संपूर्ण देश १९९३ मधील बॉम्बब्लास्टच्या घटनेने हादरुन गेला होता. मुंबईतील बॉम्बस्फोटाचा कट सुनियोजितपणे आखला गेला होता. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Underworld Don Dawood Ibrahim) इशारा मिळाल्यानंतर मुंबईतील बॉम्बस्फोटांसाठी सर्वप्रथम लोकांची निवड करण्यात आली होती. या सगळ्यांना दुबईमार्गे पाकिस्तानात (Dubai via Pakistan) पाठवून प्रशिक्षण देण्यात आले होते. तस्करीचे जाळे वापरून दाऊदने अरबी समुद्रमार्गे स्फोटके मुंबईत पोहोचवली होती. मुंबईतील विविध भागात सुमारे दोन तास हे स्फोट सुरू होते. या घटनेने संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती.

ऐका हो ऐका! ठाकरे सरकारची नवी नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद : वाचा एका क्लिकवर

See also  नाशिकच्या महापालिका आयुक्तांची तडकाफडकी बदली; 'या' घोटाळ्याचं प्रकरण भोवल्याची शक्यता

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites