Maharashtra Police : खुशखबर! महिला पोलिसांच्या कामाचे तास कमी; आता १२ ऐवजी..

महाराष्ट्रातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने त्यांच्या ड्युटीचे तास कमी केले आहे l Maharashtra Police reduced working hours of Women Police personnel
महाराष्ट्रातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने त्यांच्या ड्युटीचे तास कमी केले आहे l Maharashtra Police reduced working hours of Women Police personnel
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

महाराष्ट्रातील महिला पोलीस (Maharashtra Women Police) कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने (State Government) त्यांच्या ड्युटीचे तास कमी केले आहे.

याआधी महिला आणि पुरूष पोलीस कर्मचाऱ्यांना १२ तास ड्युटी करावी लागत होती. मात्र, आता महिला पोलीस कर्मचाऱ्यांना फक्त ८ तासच ड्युटी असणार आहे. (Reduce in Duty Hours for Maharashtra Women Police) राज्याचे पोलीस महासंचालक (State Director General of Police (GDP) संजय पांडे (Sanjay Pande) यांच्या वतीने यासंबंधीचे आदेश जारी केले आहे.

त्यानुसार, महाराष्ट्रात महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आता १२ तासांऐवजी ८ तास ड्युटी होणार आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठीचा हा नवीन निर्णय प्रायोगिक पातळीवर लागू करण्यात येणार आहे.

१० वी, १२ वी परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती; सविस्तर वाचा

सर्वसाधारणपणे, पुरूष आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांना १२ तासांची शिफ्ट असते. गुरुवारी पोलीस महासंचालकांनी (Director General of Police) दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, महिला कर्मचाऱ्यांसाठी आठ तास ड्युटी ही पुढील आदेश येईपर्यंत लागू असणार आहे.

महिला अधिकाऱ्यांना काम आणि वैयक्तिक जीवनात चांगला समतोल साधता यावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. यापूर्वी हा निर्णय नागपूर शहर (Nagpur city), अमरावती शहर (Amravati city) आणि पुणे ग्रामीणमध्ये (Pune rural) लागू करण्यात आला होता.

See also  मोठी कारवाई! 9 जणांसह पाकिस्तानी बोट पकडली, तब्बल 280 कोटींचे 'हेरॉईन' जप्त

‘या’ परिस्थितीत हा निर्णय लागू नाही (This decision does not apply in case of Emergency)

आपत्कालीन स्थितीत (Emergency Situation) किंवा सणासुदीच्या काळात (Festive Season) महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास वाढवले जाऊ शकतात. मात्र, ते केवळ संबंधित जिल्हा पोलीस अधीक्षक (District Superintendent of Police) किंवा पोलीस उपायुक्तांच्या (Deputy Commissioner of Police) परवानगीने करता येऊ शकते.

चला तयारीला लागा भावांनो! राज्यात लवकरच होणार ७ हजार पोलिसांची मेगाभरती

See also  Russia Ukraine War : रशियन हल्ल्याचा दुसरा दिवस; युद्धात ८०० हून अधिक रशियन सैनिक ठार, ३० टँक आणि ७ गुप्तचर विमानेही नष्ट युक्रेनचा दावा

Share on Social Sites