
बक्सर (बिहार) l Buxar (Bihar) :
बिहार राज्यातील बक्सरमध्ये आज (दि. २६ जानेवारी) ध्वजारोहण करताना एक मोठी दुर्घटना घडली आहे. ध्वजारोहणाच्या (Flag Hoisting) पाईपमधून विजेच्या प्रवाह गेल्याने झालेल्या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून अनेक मुले गंभीर जखमी झाली आहे. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बक्सरच्या नाथुपूर प्राथमिक शाळेत (Nathupur Primary School, Buxar) झेंडा फडकवताना शाळकरी मुलांना विजेचा धक्का लागल्याने एक मोठा अपघात झाला. यात एका मुलाचा मृत्यू झाला तर ०४ मुले गंभीर जखमी झाली आहे. त्याच्यावर बक्सर सदर रुग्णालयात (Buxar Civil Hospital) उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती देताना मुलांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मुले ध्वजारोहण करण्यासाठी शाळेत पोहोचत असताना ध्वज फडकवला जाणाऱ्या पाईपमध्ये करंट (Electricity Current) आला. त्याचवेळी शाळकरी मुलांना त्याचा धक्का बसला. त्याच वेळी, डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात आलेल्या जखमी मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे, तर इतर जखमी मुलांवर उपचार सुरू आहेत.
धक्कादायक! नाशिक महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ
या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, मुलांचे कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे. स्थानिक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मुलांवर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. याशिवाय पाईपमध्ये करंट कसा आला? हे आता तपासलं जात आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा आता सखोल तपासही केला जाणार आहे.
विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील सर्व शाळांमध्ये ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात येत. बिहारमधील नाथुपूर येथील प्राथमिक शाळेतही तिरंगा फडकवण्यासाठी मुले शाळेत पोहोचली होती. पण यावेळी ध्वजारोहणापूर्वी मुलांनी ध्वजाच्या पाईपला हात लावला. तेव्हा त्यांना वीजेचा जोरदार धक्का बसला. यादरम्यान एका मुलाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच माजी मंत्री संतोष निराला (Former Minister Santosh Nirala) आणि काँग्रेस आमदार विश्वनाथ राम (Congress MLA Vishwanath Ram) यांनी सदर रुग्णालयात पोहोचून मुलांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. त्याचबरोबर बिहार सरकारचे माजी मंत्री संतोष निराला यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. सध्या अपघातात जखमी झालेल्या मुलांची प्रकृती सामान्य आहे.