
उत्तर प्रदेश l Uttar Pradesh :
मॉडिफाइड दुचाकींवरील कर्कश आवाजातील सायलेंसर आणि आपला थाट दाखवण्यासाठी लावण्यात येणाऱ्या फॅन्सी नंबर प्लेट हे काही आता कोणाला नवीन राहिलेले नाही.
रस्त्यावरुन प्रवास करताना अशा अनेक दुचाकी आपल्या नजरेला पडत असतात. पण उत्तर प्रदेशात तर दुचाकी चालकाने भयंकर कहरच केला आणि विशेष म्हणजे यासाठी त्याला थेट जेलची हवा पण खावी लागली आहे.
Viral Video : कारची चावी कारमध्येच राहिली तर काय करावे… पाहा हा ‘देसी जुगाड’
तर ते झालं असं की, मुरादगंजचे अधिकारी अविनाश कुमार (Muradganj Officer Avinash Kumar) हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना तीन तरुण दुचाकीवरुन जाताना दिसले. दुचाकीवरुन तिघे प्रवास करत असल्याने त्यांना थांबवण्यात आलं असता एक अजब प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांची नंबर प्लेट काही तरी भलतीच विचित्र होती. तिथे रजिस्ट्रेशन नंबरच्या जागी चक्क “बोल देना पाल साहब आये थे” (Bol Dena Pal Saheb Aaye The) असं लिहिलं होतं.
पुलिस अधीक्षक औरैया @vermaabhishek25 के निर्देशन में थाना अजीतमल पुलिस ने वाहन चेकिंग के दौरान 03 सवारी मोटर साइकिल जिसके नं0प्लेट पर कूटरचित “बोल देना पाल साहब आये थे”लिखा था जिसमें वाहन को सीज कर वाहन चालक के विरूद्ध वैधानिक कार्यवाही की गयी। pic.twitter.com/JgS4Y8qpoW
— Auraiya Police (@auraiyapolice) March 16, 2022
फक्त एवढंच नाही, तर दुचाकीला कर्कश आवाजातील सायलेंसर लावण्यात आला होता. मूळचा सायलेंसर काढून त्या जागी थेट ट्रॅक्टरचा सायलेंसर (Tractor Silencer in Bike) लावण्यात आला होता.
याशिवाय तरुणांन पैकी एकानेही हेल्मेटदेखील घातलं नव्हतं. मग काय इतक्या नियमांचं उल्लंघन केलं असल्याने या तरुणांना थेट जेलमध्ये जावं लागलं. पोलिसांनी ट्वीट करत हा सगळा घटनाक्रम सांगितलं आहे.
आज @auraiyapolice की नज़र एक मोटर साइकिल पर पड़ी जिस पर लिखा हुआ था “बोल देना पाल साहब आए थे “ उस पर बैठे युवको को यह नही पता था की पाल साहब की यह सवारी आयी तो सही लेकिन जा नही पाएगी ! यह तो वही बात हो गयी-“राह में चलते मुलाक़ात हो गयी जिससे डरते थे वही बात हो गयी”।@Uppolice pic.twitter.com/hsdpeLQXRr
— ABHISHEK VERMA I.P.S (@vermaabhishek25) March 15, 2022
औरेयाचे पोलीस अधिक्षक अभिषेक वर्मा (Auraiya’s Superintendent of Police Abhishek Verma) यांनी ट्विटरला सर्व प्रकार सांगताना लिहिलेल्या गाण्याच्या ओळींनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
१९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या विजयपथ चित्रपटातील (Vijaypath Movie) गाण्याच्या ओळी “राह में चलते मुलाक़ात हो गयी जिससे डरते थे वही बात हो गयी” त्यांनी ट्वीटमध्ये लिहिल्या आहेत.
— Auraiya Police (@auraiyapolice) March 16, 2022
उत्तर प्रदेश पोलिसांनीही या घटनेची दखल घेतल गाण्याच्या ओळींमधून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांनी तर थेट पाल यांनाच गाणं समर्पित केलं.
मैं ‘पाल’ दो ‘पाल’ का राइडर हूँ
‘पाल’ दो ‘पाल’ मेरी कहानी है
‘पाल’ दो ‘पाल’ मेरी हस्ती है
‘पाल दो पाल’ मेरी जवानी है
मैं ‘पाल’ दो ‘पाल’ का राइडर हूँ
‘पाल’ दो ‘पाल’ मेरी कहानी है
‘पाल’ दो ‘पाल’ मेरी हस्ती है
‘पाल दो पाल’ मेरी जवानी है 😊आप ‘पाल’ साहब को कौन सा गाना डेडिकेट करना चाहेंगे?#तीनतिगाड़ाकामबिगाड़ा #बुरानामानोहोलीहै pic.twitter.com/q4ZZFCvrtk
— UP POLICE (@Uppolice) March 16, 2022