
नवी दिल्ली । New Delhi :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज (दि. ०८) राज्यसभेत (Rajya Sabha) केलेल्या भाषणात काँग्रेसवर तुफान हल्लाबोल केला आहे. काँग्रेस (Congress) नसती तर आणीबाणीचा कलंक लागला नसता. काँग्रेस नसती तर घराणेशाहीला आळा बसला असता.
काँग्रेसमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. काँग्रेस नसती तर जातीयवाद संपला असता. काँग्रेस नसती तर शिखांचा नरसंहार झाला नसता, अशी जहरी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.
शेतकऱ्याच्या जनधन खात्यात जमा झाले चक्क १५ लाख, मोदींचे आभार मानत बांधलं स्वप्नातलं घर आणि मग…
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान मोदी राज्यसभेत बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसवर कडाडून टीका केली. काँग्रेसला फक्त उपदेश देण्याची सवय आहे, असा आरोप करत नरेंद्र मोदी म्हणाले, देशात काँग्रेस नसती तर भ्रष्टाचार झाला नसता, सरकार अस्थिर करणे हेच काँग्रेसचे काम आहे.
राष्ट्रीय या शब्दावर काँग्रेसला आक्षेप आहे तर काँग्रेसने पक्षाचे नाव बदलून आपल्या पूर्वजांची चूक काँग्रेसने सुधारली पाहिजे, असा टोला नरेंद्र मोदी यांनी यावेळी काँग्रेसला लगावला.
सत्तेतून विकास साधला नाही
काँग्रेस नसती तर काश्मीरच्या पंडितांना काश्मीर सोडावा लागला नसता. काँग्रेस नसती तर मुलींना जाळण्याची घटना घडली नसती. रस्ते, वीज, पाण्यासारख्या पायाभूत सुविधांसाठी एवढे दिवस थांबावे लागले नसते.
काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी देशाचा विकास केला नाही, आता विरोधात आहे तर विकासात अडथळा आणत आहेत. केंद्रात सत्ता असताना काँग्रेसने ५० पेक्षा जास्त राज्य सरकारे बरखास्त केली, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केला.
काँग्रेसचे उद्या मोदी माफी मागो आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसवर निशाणा साधला याचे पडसाद आता महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन पुकारले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देत सांगितले, उद्यापासून राज्यात मोदी माफी मागो आंदोलन पुकारण्यात येणार आहे.
उद्या सर्व भाजप कार्यालयांसमोर आम्ही महाराष्ट्राच्या झालेल्या अपमानाचा निषेध करणार आहोत. हातात फलक घेऊन मोदी माफी मागो अशी मागणी करणार आंदोलन करण्यात येईल.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
आजपासून १२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण; जाणून घ्या कोठे मिळणार डोस
How to Remove Odor From Shoes : पावसाळ्यात बुटांचा कुबट वास येतो? जाणून घ्या 'हे...
Today’s Horoscope : 'असा' असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन,...
Rule Changes from 1st June : 1 जूनपासून बँकिंग, विमा आणि गृहकर्जासह अनेक क्षेत्र...