धुळे : एकाच कुटुंबातील पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, सर्वांची प्रकृती चिंताजनक

एकाच कुटुंबातील पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, सर्वांची प्रकृती चिंताजनक l Attempted mass suicide of family in Avadhan Dhule Maharashtra
एकाच कुटुंबातील पाच जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, सर्वांची प्रकृती चिंताजनक l Attempted mass suicide of family in Avadhan Dhule Maharashtra
Share on Social Sites

धुळे l Dhule :

शहरा जवळ असणाऱ्या अवधान (Avdhan) गावात एकाच परिवारातील चार आणि त्या परिवारात राहणाऱ्या अन्य एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची बाब उघडकीस आली आहे.

या सामूहिक आत्महत्येचा कारणाचा आता मोहाडी पोलिस (Mohadi police) तपास करत आहेत. या सर्व पाचही जणांना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात (Hiray Medical College) दाखल करण्यात आले असून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

शिरपूर तालुक्यातील दहिवद (Dahivad, Shirpur) येथे राहणारे गणेश रावळ गोपाळ (Ganesh Rawal Gopal) हे रोजगारासाठी धुळ्याच्या औद्योगिक वसाहती (Dhule MIDC) मध्ये आले होते. यासाठी त्यांनी अवधान गावात दौलत नगरमध्ये भाडेतत्त्वावर घर घेतले.

धक्कादायक! महिलेनेच आखला प्लॅन; अल्पवयीन मुलीवर ८ जणांकडून बलात्कार

आपल्या उद्योग व्यवसायामध्ये व्यस्त असणाऱ्या या परिवारातील चौघे सदस्यांनी तसेच परिवारात राहणाऱ्या एका युवकाने एकाच वेळी विष प्राशन केल्याची माहिती गोपाळ यांनी त्यांच्या घर मालकाला दिली. यानंतर शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी घरात पाहिले असता गणेश रावल गोपाळ (वय ४२), गोविंदा गणेश गोपाळ (वय १२), जयश्री गणेश गोपाळ(वय १४), सविता गणेश गोपाळ (वय ३५) व भरत पारधी (वय २४) यांना त्रास होत असल्याचे दिसून आले.

त्यामुळे त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. एकाच परिवारातील पाच जणांनी विषप्राशन केल्याच्या खळबळजनक घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. ही माहिती मिळाल्याने मोहाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे (Inspector Dattatraya Shinde of Mohadi Police Station) हे पथकासह हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले.

त्यांनी या सामूहिक आत्महत्येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या पाचही जणांवर उपचार सुरू असल्याने त्यांची जबाब नोंदवण्यात अडचणी आल्या. दरम्यान परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न सुरू असला तरीही अद्याप या सामुहिक आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. तूर्त या घटनेची मोहाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Dhule : धुळे जिल्ह्यात ‘या’ कारणास्तव ११ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित

See also  तुमची मुले देखील Kinder Joy खातात का?, मग ही बातमी तुमच्यासाठी, तक्रारीनंतर कंपनीने घेतला 'हा' मोठा निर्णय

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites