मुंबई l Mumbai :
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज (दि. २७) रोजी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये (Supermarket) आता वाईनची (Wine) विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे.
याबद्दल बोलताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik, Minister of State for Minorities) म्हणाले, महाराष्ट्रात बऱ्याच वाईनरी असताना आता १००० चौरस फुटांच्या छोट्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर (Farmers’ Fruit Products) वाईनरी (Winery) चालते. त्यांना चालना देण्यासाठी वाईन विक्री करता येणार आहे.
राज्यात नवी वाईन पॉलिसी (New Wine Policy) राबवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. पुढच्या वर्षापर्यंत वाईन उद्योगाचा विस्तार १ हजार कोटी लीटरपर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीने आता राज्य सरकारने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे. सध्या राज्यात वाईनची दरवर्षी ७० लाख लिटरची विक्री होते. सरकारच्या या नव्या धोरणामुळे हा आकडा १ हजार कोटी लिटरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
Nagarpanchayat Reservation : राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर; सविस्तर वाचा
मात्र, त्या आधी राज्य सरकारने वाईनवर प्रति लिटर १० रुपयांचा अबकारी कर (Excise Duty) जाहीर केला आहे. त्यामुळे वाईन थोडी महाग होणार आहे.
दुसरीकडे, अनेक बेकरी पदार्थांमध्ये वाईनचा उपयोग होत असतो. बहुतेक वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यंत कमी असते. त्यामुळे वाईनचा वापर चवीसाठी केला जात असतो. त्यामुळे दैनंदिन किराणा दुकानात होणाऱ्या वाईनची विक्री ही बीअरच्या धर्तीवर कॅनमधून करण्याची मागणी होत आहे.
उत्पादन शुल्काने या आधीच आयात व्हिस्कीवरील (Whiskey) शुल्क ३०० टक्क्यांवरून १५० टक्क्यांवर आणले आहे. आता सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.