मुंबई l Mumbai :
आज (दि. 29) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने बैठक घेत अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये औरंगाबादचे (Aurangabad) नाव संभाजीनगर (Sambhajinagar) आणि उस्मानाबादचे (Osmanabad) नाव धाराशिव (Dharashiv) करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर बैठकीत सरकारने अनेक निर्णय तर अनेक प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या विभागाच्या दहा निर्णयाचा सामावेश आहे. (Maharashtra Cabinet today Meeting 10 Major Decisions)
‘जय महाराष्ट्र’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अखेर राजीनामा
कॅबिनेटच्या या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी (CM Udhhav Thackeray) सोडून गेलेल्या आमदारांचे आभार मानत आत्तापर्यंत साथ दिल्याबद्दल आभारी आहे असं म्हटलं आहे. तसेच मला माझ्या सहकाऱ्यांनी धोका दिला असं म्हणत त्यांनी उरलेले निर्णय पुढच्या बैठकीत घेण्यात येतील असं सांगत सर्वांचा निरोप घेतला आहे. (10 Major Decisions Taken by Mahavikas aghadi Government in Cabinet meeting Mumbai)
#WATCH | Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray leaves from Mantralaya in Mumbai, after the state cabinet meeting concludes. pic.twitter.com/la9y25r4HE
— ANI (@ANI) June 29, 2022
आज दि. 29 जून 2022 मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात पाहुयात
• औरंगाबाद शहराच्या ‘संभाजीनगर’ (Sambhajinagar) नामकरणास मान्यता.
(सामान्य प्रशासन विभाग)
Maharashtra state cabinet approves the renaming of Aurangabad to Sambhaji Nagar and Osmanabad to Dharashiv. Navi Mumbai Airport's name will be changed to DB Patil International Airport.
— ANI (@ANI) June 29, 2022
• उस्मानाबाद (Osmanabad) शहराच्या “धाराशीव” (Dharashiv) नामकरणास मान्यता.
(सामान्य प्रशासन विभाग)
• नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai International Airport) लोकनेते स्वर्गीय दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ (D B Patil International Airport) या नामकरणास मान्यता.
(नगर विकास विभाग)
• राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण (Turmeric research and processing policy) लागू करणार. हिंगोली जिल्ह्यात (Hingoli district) मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र (Hon. Balasaheb Thackeray Haridra (Turmeric) Research and Training Center) स्थापन करणार.
(कृषि विभाग)
• कर्जत (जि. अहमदनगर) (Karjat (District Ahamadnagar) येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) न्यायालय स्थापन करणार
(विधि व न्याय विभाग)
• अहमदनगर-बीड -परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या (Ahmednagar-Beed-Parli Vaijnath new railway line project) सुधारित खर्चास मान्यता व त्यासाठी राज्य शासनाचा हिस्सा देणार
(परिवहन विभाग)
• ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना (Krantijyoti Savitribai Phule Gharkul Yojana) राबवणार.
(इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
Today Uddhav Thackeray govt took the decision that Aurangabad will be renamed Sambhaji Nagar and Osmanabad will be renamed Dharashiv. Be it BJP or MVA – that is walking on crutches – want to sideline Muslims: Abu Asim Azmi, Samajwadi Party, Maharashtra president, and MLA pic.twitter.com/dOVjIpmJCJ
— ANI (@ANI) June 29, 2022
