नाशिक l Nashik (वि. प्र.)
आज व्यक्ती हेल्थ कॉन्शस (Health Conscious) झाला आहे. प्रत्येक वेळेस काय खावे काय खाऊ नये हे तो बघत असतो. शरीर स्वास्थ्य चांगले रहावे, आजारी पडू नये, यासाठी तो काळजी घेतो. परंतु आज या सर्व बाबींचा सोबतच मन सुद्धा सुदृढ राखणे खूप गरजेचे आहे. मन जर सुदृढ असले तर स्वास्थ्य सुद्धा चांगले राहते. मात्र मन कमकुवत असले कमजोर असले द्विधा मनस्थिती असले तर स्वास्थ्य सुद्धा खराब होते, स्वास्थ् ढासळू शकते. यासाठी मनाला सुदृढ ठेवणारा राजयोगा मेडिटेशन (Rajyoga meditation) प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. ब्रह्माकुमारी संस्थेच्या सर्व सेवा केंद्रांवर हा राजयोग मेडिटेशन कोर्स (Rajyoga meditation Cource) निशुल्क उपलब्ध असून प्रत्येकाने या कोर्सचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दिदीजी (Rajyogini Brahmakumari Vasanti Didiji) यांनी केले आहे.
ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध शाखांमार्फत शरीर व मन स्वस्थ राहण्यासाठी प्राणायाम योगासन व राजयोग मेडिटेशनचे कार्यक्रम घेतले जात आहेत याच श्रुंखलेत म्हसरूळ (Mhasrul) येथील स्थानीय ब्रह्माकुमारी मुख्य सेवा केंद्रात प्रभू प्रसाद सभागृहात महिलांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी वासंती दीदीची अध्यक्षीय संबंधात बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली याप्रसंगी डॉक्टर सोनखासकर (Dr. Sonkhaskar), नगरसेविका वत्सलाताई खैरे (Corporator Vatsalatai Khaire), योग शिक्षिका डॉक्टर मनीषा कापडणीस (Yoga teacher Dr. Manisha Kapdanis), ब्रह्माकुमारी पुष्पा दीदी, ब्रह्माकुमारी वीणा दीदी, ब्रह्माकुमारी पूनम दीदी, ब्रह्माकुमारी सरला दीदी आदी मान्यवर उपस्थित होते.
हुश्शह! निकाल तर लागला.. पण आता पुढे काय? ‘हे’ आहेत 10वी नंतरचे ‘बेस्ट करियर ऑप्शन’
