दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू : खान्देशातील दुर्दैवी घटना

दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू : खान्देशातील दुर्दैवी घटना l Milk tanker and tempo collied on each other 5 killed on spot Muktainagar Jalgaon
दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू : खान्देशातील दुर्दैवी घटना l Milk tanker and tempo collied on each other 5 killed on spot Muktainagar Jalgaon
Share on Social Sites

जळगाव । Jalgaon :

खान्देशातील जळगाव जिल्ह्यात काल (दि. 12) एक भीषण अपघात झाला. रस्त्यावर बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दूध (Milk Tanker Accident) टाकत असताना भरधाव वेगाने आलेल्या एकापाठोपाठ चार ते पाच वाहनांनी टँकरला धडक दिली. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले. मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव (Ghodasgaon, Muktainagar Taluka) जवळ शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. (Accident at Ghodasgaon 5 killed Muktainagar Jalgaon)

महागाईचा भोंगा! मोडला ‘इतक्या’ वर्षांचा रेकॉर्ड; सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावपासून दोन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री धुळ्याहून (Dhule) दूध घेऊन चाललेला टँकर अचानक बंद पडला. यामुळे टँकरच्या मालकाने घटनास्थळी दुसरा टँकर बोलावला. या ठिकाणी बंद पडलेल्या टँकरमधून दुसर्‍या टँकरमध्ये दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू केले.

यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; महाराष्ट्रातील पाचजण जागीच ठार, 2 गंभीर

यासाठी एक क्रेन देखील बोलावण्यात आली होती. यानुसार दूध शिफ्ट करण्याचे काम सुरू असताना अंधारात वाहने न दिसल्याने समोरून भरधाव वेगाने टाईल्सने भरलेल्या ट्रक त्या पाठोपाठ दोन कारने अशा चार ते पाच भरधाव वाहनांनी दोन्ही महामार्गावर उभ्या टँकर्स आणि क्रेनला धडक दिली. यात बंद पडलेल्या टँकरमधील तीन जण, टँकरचा धुळ्यावरून आलेला मालक आणि अजून एक जण अशा पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

See also  वा रे वा नाशिक पोलिस! थेट पोलिस चौकीतच रंगली 'ओली पार्टी'; Video काढणाऱ्यांना चोप

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Nashik Municipal Election 2022 : निवडणुकीचा धुराळा उडणार; नाशिक महापालिकेची 'अशी' असेल प्रभाग रचना

Share on Social Sites