नाशिक l Nashik :
महापालिका निवडणुका (Nashik Municipal Election 2022) वेळेत होतील कि नाही यावर गेल्या दिड महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला अखेर आज (दि. ०१) रोजी पुर्णविराम मिळाला आहे. नाशिक महापालिकेची प्रभाग रचना (Nashik Municipal Election Ward Structure) मंगळवारी (दि. ०१) दुपारी जाहीर झाली असून, यंदा ४४ प्रभाग राहणार आहे.
आज सकाळपासूनच महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये इच्छुकांसह विद्यमान नगरसेवकांनी एकच गर्दी केली होती. महापालिकेची यंदा ०७ वी पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होत आहे.
त्यादृष्टीने प्रारूप प्रभागरचना आज उपायुक्त (प्रशासन) मनोज घोडे पाटील (Deputy Commissioner (Administration) Manoj Ghode Patil) यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे यात प्रभाग क्र. ०८ मध्ये चार सदस्य अर्थात नगरसेवक निवडले जाणार आहेत. तसेच आजपासूनच हरकती व सूचना मागविल्या जाणार असून त्यानुसार एप्रिल महिन्यात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होतील.
१५ मार्चला मुदत संपणार (The deadline is March 15)
नाशिक महापालिकेची पंचवार्षिक मुदत पंधरा मार्चला संपुष्टात येत आहे. त्यानुसार एक मार्चला महापौर (Mayor), उपमहापौर (Deputy Mayor) कार्यालयाला त्यासंदर्भातील पत्र नगरविकास विभागाकडून प्राप्त होईल. या कालावधीत निवडणुक न झाल्यास प्रशासकीय राजवट लागू होईल. परंतू त्यापुर्वीचं प्रशासकीय राजवट लागु होणार असल्याचे बोलले जात आहे. परंतू महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिकची मुदत संपुष्टात येत नाही. तोपर्यंत प्रशासकीय राजवट लागू होणार नाही. त्यापुर्वी प्रशासक बसवायचा असल्यास महापालिका बरखास्त करावी लागेल. परंतू बरखास्ती शक्य नसल्याने प्रशासक बसविण्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.
मुंबईच्या धर्तीवर नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभागरचना (Nashik Municipal Corporation’s model ward structure on the lines of Mumbai)
नाशिक महापालिकेसह राज्यातील १८ महापालिकांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. कोरोना (Corona), आरक्षणाच्या (Reservation) गोंधळामुळे अद्यापर्यंत निवडणुकीच्या प्रक्रियेला मोठा विलंब झाला आहे.
नियमित वेळेत निवडणुक झाल्यास आता पर्यंत आचारसंहिता लागु होणे अपेक्षित होते परंतू तसे न झाल्याने अनेक इच्छुकांची घालमेल वाढली. सहा जानेवारीला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्यात आला होता. ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) दि. ०८ फेब्रुवारीला निर्णय होणार असल्याने प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यास विलंब होईल.
त्यामुळे राज्य निवडणुक आयोगाने मुंबई महापालिकेचा प्रारूप प्रभाग रचनेचा एक फेब्रुवारीला जाहीर करण्याचे घोषित केले. निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द केली जाणार असून याच तारखेपासून हरकती व सूचना मागविल्या जातील. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे.
https://nmc.gov.in/home/getfrontpage/184/133/#tabs|History:tab2_1
एप्रिल महिन्यात निवडणुक? (Election in April?)
प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर केल्यानंतर आजपासून दि. १४ फेब्रुवारी पर्यंत हरकती व सुचना मागविल्यानंतर राज्य निवडणुक आयोगाकडे अहवाल सादर करण्यापर्यंत साधारण फेब्रुवारी अखेर प्रभाग रचना अंतिम केली जाईल. या दरम्यान मतदार याद्यांचे भागनिहाय विभाजन होईल. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यास पुढील ४५ दिवसात एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुक होण्याची शक्यता आहे.
ऐका हो ऐका! ठाकरे सरकारची नवी नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद : वाचा एका क्लिकवर
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
'स्वर' देवतेची 'स्वरयात्रा' विसावली; गानकोकिळा लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड
Blog (विशेष लेख) : कसयं ना शेठ... 16 ते 18 वर्षाच्या 'रिल्स स्टार'ची जिंदगी
मालट्रक आणि कारच्या समोरासमोरील धडकेत दोंडाईच्यातील व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू
दहावी-बारावीच्या परीक्षा Offline की Online ?, याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिला...