
धुळे l Dhule :
राजस्थान (Rajasthan) राज्यातुन जालना (Jalna) जिल्ह्याकडे चालविलेला हत्यारांचा साठा सोनगिरी पोलीस ठाण्याचे (Songir Police Station) सहाय्यक निरीक्षक चंद्रकांत पाटील (Assistant Inspector Chandrakant Patil) यांच्या पथकाने जप्त केला आहे. या कारवाईत एका स्कार्पियो कार (Scorpio Car) मधून तब्बल 89 तलवारीसह एक खंजीर (Dagger) पोलिसांनी जप्त केले असून चौघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (89 Swords 1 Khanjar seized in Songir Dhule)
सावधान! राज्यात पुढील 5 दिवस धोक्याचे… देशातील 70 टक्के भागांत वाहणार भयंकर उष्णतेची लाट
या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील (Superintendent of Police Praveen Kumar Patil) यांनी दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव (Upper Superintendent of Police Prashant Bachhav), स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील (Inspector of Local Criminal Investigation Department Hemant Patil), उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे (Sub-Divisional Police Officer Pradip Mairale), सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील (Assistant Police Inspector Chandrakant Patil) आदी उपस्थित होते.
लज्जास्पद! सासऱ्याने लेकीसमान सूनेवरच केला वारंवार बलात्कार; खान्देशातील खळबळजनक घटना