GST ची ‘रेड’… भिंतीत लपवल्या 10 कोटींच्या नोटा आणि 19 किलो चांदीच्या विटा!

GST ची ‘रेड’... भिंतीत लपवल्या 10 कोटींच्या नोटा आणि 19 किलो चांदीच्या विटा! l Cash worth Rs 10 Cr Silver bricks recovered by GST dept Mumbai
GST ची ‘रेड’... भिंतीत लपवल्या 10 कोटींच्या नोटा आणि 19 किलो चांदीच्या विटा! l Cash worth Rs 10 Cr Silver bricks recovered by GST dept Mumbai
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

राज्यात जीएसटी चोरीच्या अनेक घटना समोर येत असतानाच आता मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्य जीएसटी विभागाने (State GST department) मुंबईतील झवेरी बाजार (Zaveri Bazar Mumbai) परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवण्यात आलेली 10 कोटींची रोकड, 19 किलो चांदीच्या विटा आढळून आल्या आहेत. (10 Crore rupees cash and 19 kg silver bricks found in wall Mumbai)

मुंबईच्या झवेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन (Chamunda Bullion, Zaveri Bazaar, Mumbai) या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत संशयास्पदरित्या वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आले.

त्यानंतर जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही. कंपनीच्या 35 चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली 9 कोटी 78 लाखांची रोकड आणि 19 किलो वजनाच्या (13 लाख रुपये किमतीच्या) चांदीच्या विटा आढळून आल्या.

राज्य जीएसटी विभागाने ही जागा सिलबंद केली असून प्राप्तीकर विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाने ही रक्कम आणि मालमत्तेचा स्त्रोत शोधण्यास सुरुवात केली आहे.

https://twitter.com/singhpuru2202/status/1517706520200626176

See also  MPSC Recruitment 2022 : MPSC मध्ये 'या' पदासाठी बंपर भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती

राज्य जीएसटी विभागाने गेल्या काही महिन्यांपासून जीएसटी चोरी शोधणे आणि कारवाईची मोहिम तीव्र केली असून हजारो कोटींची जीएसटी चोरी शोधण्यात यश मिळविले आहे. राज्य कर विभागाचे सहआयुक्त राहूल द्विवेदी (Rahul Dwivedi, Joint Commissioner, State Tax Department), उपायुक्त विनोद देसाई (Vinod Desai, Deputy Commissioner) यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. जीएसटी चोरीविरुद्धची कारवाई या पुढच्या काळात अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती राज्य कर आयुक्त राजीव मित्तल (State Tax Commissioner Rajiv Mittal) यांनी दिली आहे.

उद्धवा, अजब तुझे… पोलीस पदन्नोतीच्या आदेशाला अवघ्या 12 तासांत स्थगिती; कुणाचं प्रमोशन थांबवलं?

गेल्या महिन्यात ठाणे जिल्ह्यात मोठी कारवाई

एका भामट्याने खोटे कागदपत्रे दाखवत शासनाची तब्बल 84 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. संबंधित घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, देशातील GST फसवणुकीची ही सर्वात मोठी घटना असल्याचं बोललं जात आहे. संबंधित घटना ही ठाणे (Thane) जिल्ह्यातील कल्याण (Kalyan) शहरातून समोर आली आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. आरोपीने शासनाची तब्बल 84 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं आता उघड झालं आहे. पोलिसांनी आरोपीला कल्याण इथून अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

संबंधित 49 वर्षीय आरोपीचं अशोक राजभर (Ashok Rajbhar) असं नाव आहे. त्याने हार्डवेअरींग आणि नेटवर्किंगचा व्यापार असल्याचं दाखवलं होतं. त्याने शासनासमोर सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये 475 कोटींचा खोटा व्यापार दाखवला होता. त्यातून त्याने शासनाची 84 कोटी रुपयांची फसवणूक केली.

लग्नापूर्वीच ‘या’ गायिकेचा Porn Video व्हायरल; गायिकेने केले भावनिक आवाहन

See also  Corona Vaccine : आता २ ते ६ वर्षांच्या मुलांना लवकरच मिळणार Corona ची लस

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Today Rashibhavishya 10 August 2022 : 'या' राशींसाठी खूप चांगला जाणार आजचा दिवस, जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशिभविष्य

Share on Social Sites