IPL सुरू होण्याच्या 48 तासांपूर्वी धोनीचा धमाका; CSK चं कर्णधारपद सोडलं : खास भिडूकडे सोपवलं नेतृत्व

IPL सुरू होण्याच्या 48 तासांपूर्वी धोनीचा धमाका; CSK चं कर्णधारपद सोडलं : खास भिडूकडे सोपवलं नेतृत्व l IPL 2022: MS Dhoni hands over the captaincy of CSK to Ravindra Jadeja
IPL सुरू होण्याच्या 48 तासांपूर्वी धोनीचा धमाका; CSK चं कर्णधारपद सोडलं : खास भिडूकडे सोपवलं नेतृत्व l IPL 2022: MS Dhoni hands over the captaincy of CSK to Ravindra Jadeja
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

अष्टपैलू खेळाडू महेंद्रसिंह धोनी याने (Mahendra Singh Dhoni) चेन्नई सुपर किंग्सच्या कॅप्टनसीचा राजीनामा दिला आहे. धोनीने रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) कॅप्टनसी देण्याचा निर्णय दिला आहे.

चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings (CSK) पहिली मॅच शनिवारी (दि. 26) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरूद्ध (CSK Vs KKR) शनिवारी होणार आहे. त्यापूर्वी धोनीनं हा मोठा निर्णय घेतला आहे. (MS Dhoni has resigned as captain of the Chennai Super Kings)

रविंद्र जडेजा 2012 पासून सीएसकेच्या टीमचा सदस्य आहे. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये 2 वेळा आयपीएल जिंकण्यात त्याचे योगदान होते. आयपीएल 2021 मध्ये जडेजा चांगलाच फॉर्मात होता.

त्याने 16 मॅचमध्ये 227 रन केले तसंच 13 विकेट्स घेतल्या. तो बॅटींग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रामध्ये टीमसाठी योगदान देतो. तसंच सध्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही फॉर्मात आहे. त्यामुळेच धोनीनंतर सीएसकेचा कॅप्टन म्हणून जडेजाचे नाव सर्वात आघाडीवर होते.

आयपीएल 2022 पूर्वी चेन्नईने चार खेळाडूंना रिटेन केले. त्यामध्ये टीम इंडियाचा ऑल राऊंडर जडेजाचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. जडेजाला चेन्नईने 16 कोटींना तर धोनीला 12 कोटींमध्ये रिटेन केले.

धोनीने स्वत: जडेजासाठी पहिला क्रमांक सोडला होता. त्यानंतर जडेजाच सीएसकेचा भावी कॅप्टन असेल, असा अंदाज करण्यात येत होता. आयपीएल स्पर्धेपूर्वी तो अंदाज खरा ठरला आहे.

महेंद्रसिंह धोनी आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या सिझनपासून चेन्नईचा कॅप्टन होता. त्याच्या अनुपस्थितीमध्ये काही मॅचमध्ये सुरेश रैनानं (Suresh Raina) चेन्नईची कॅप्टनसी सांभाळली होती.

पण धोनीनंतर चेन्नईचा पहिला पूर्णवेळ कॅप्टन म्हणून जडेजाची नियुक्ती करण्यात आली आहे. धोनी या सिझनमध्ये फक्त खेळाडू म्हणून खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्सनं त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तशी अधिकृत घोषणाही केली आहे.

आयपीएल इतिहासातील यशस्वी कॅप्टनमध्ये धोनीची नोंद होते. त्याच्या कॅप्टनसीमध्ये सीएसकेने चार वेळा आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच सर्व टीममध्ये चेन्नईच्या विजयाची टक्केवारी ही सर्वात जास्त म्हणजेच 64.83 टक्के आहे.

कोरोनाच्या चौथ्या लाटेचं कारण ठरणाऱ्या Omicron BA.2 ची भारतात एन्ट्री; ही लक्षणं दिसल्यास सावध व्हा!

See also  क्या बात हैं.. आता WhatsApp वरुनही चित्रपट, वेबसिरिज पाठवता येणार

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  'शिंदे सरकार'मधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; 'भाजप'कडून नव्या चेहऱ्यांना संधी?

Share on Social Sites