गर्भवती महिले सोबत डॉक्टरचे घृणास्पद कृत्य; तपासणीसाठी घेऊन गेला अन्…

गर्भवती महिले सोबत डॉक्टरचे घृणास्पद कृत्य; तपासणीसाठी घेऊन गेला अन्... l Pregnant woman sexually molest by Doctor Aundha Nagnath hingoli
गर्भवती महिले सोबत डॉक्टरचे घृणास्पद कृत्य; तपासणीसाठी घेऊन गेला अन्... l Pregnant woman sexually molest by Doctor Aundha Nagnath hingoli
Share on Social Sites

हिंगोली l Hingoli :

जिल्ह्यातील औंढा नागनाथ (Aundha Nagnath) याठिकाणी वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका डॉक्टरने तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलेसोबत लैंगिक चाळे (Sexual Molestation) केले आहेत.

पीडित महिलेनं संबंधित संतापजनक घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना दिल्यानंतर, पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत संशयित आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतले आहे. ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

‘आयटम चाहीये, तुझे? हांss..’ म्हणत फोनवरुन सेक्सची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या विभागप्रमुखाला महिलेकडून चोप

गणेश बंडेवार (Ganesh Bandevar) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव असून काल (रविवारी) गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय पीडित महिला चार महिन्यांची गरोदर होती. गेल्या शनिवारी अचानक त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे पीडित महिला रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आपल्या एका नातेवाईकाला घेऊन, औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात (Aundha Nagnath Rural Hospital) तपासणीसाठी गेली होती.

खळबळजनक! व्हिडीओ शूट करत ३ जवानांचा महिलेवर सामूहिक बलात्कार

याठिकाणी गेल्यानंतर पीडित महिलेने त्यांना होणारा त्रास रुग्णालयातील एका परिचारिकेला सांगितला. संबंधित परिचारिकेने पीडितेच्या पोटात दुखत असल्याची माहिती आरोपी वैद्यकीय अधिकारी बंडेवार याला दिली. आरोपी बंडेवार याने तपासणी करण्यासाठी पीडित महिलेला प्रसूतीगृहात घेऊन गेला.

याठिकाणी आरोपीने तपासणी करण्याच्या बहाण्याने पीडित महिलेसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर घाबरलेल्या महिलेनं याची माहिती आपल्यासोबत आलेल्या नातेवाईकाला दिली.

See also  Dhule : धुळे जिल्ह्यात 'या' कारणास्तव ११ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने निलंबित

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  अखेर Elon Musk झालेच 'ट्विटर' चे मालक; मोजले 'इतके' अब्ज डाॅलर्स

Share on Social Sites