
नाशिक । Nashik :
कोरोना संकटाच्या काळातही जिल्ह्यात वीस प्राथमिक शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे आढळून आले असून या शाळा बंद करण्यासाठी संबंधित संस्थाचालकांना नोटिसा बजाविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने (Zilla Parishad’s primary education department) दिली.
शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडे (Education Department) रितसर प्रस्ताव दाखल करावा लागतो. लागू करण्यात आलेले निकष पूर्ण केले किंवा नाही, यासंदर्भातील तपासणी शिक्षण विभागाकडून केली जाते. असे असताना जिल्ह्यात काही बोगस शाळा सुरू असल्याचे नुकतेच आढळून आले आहे.
RTE राखीव जागांबाबत सरकारचे धोरण कळेना; वारंवार बदलणार्या आदेशाने शाळाही चक्रावल्या
विशेष म्हणजे, एकीकडे कोरोनाचे सावट सुरू असताना दुसरीकडे अशा बोगस शाळांचे पेव फुटल्याने चिंताही व्यक्त करण्यात आली. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने याठिकाणी बालकांनी प्रवेश घेतला असल्याची शक्यता कमीच असल्याचे सांगण्यात आले.
सरकारकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार जिल्ह्यात एकूण वीस बोगस शाळा असल्याने आढळून आले आहे. जवळपास इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्याच मोठ्या प्रमाणात आहे.
दरम्यान, बोगस शाळांची यादी सरकारकडून जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad, Nashik) प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाली आहे. जर सरकारला बोगस शाळांबाबतची माहिती कळू शकते तर स्थानिक पातळीवर काम करणारा शिक्षण विभाग नेमका कुठे आहे, हाच खरा प्रश्न आहे. आता या शाळा बंद करण्यात याव्यात म्हणून संबंधित संस्था चालकांना नोटिसा देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Google Dog : शाब्बास! नाशिक पोलिस श्वान पथकातील ‘गुगल’ने शाेधली अपहृत अकरा वर्षांची मुलगी
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
नोकराचा प्रताप! मालकाचे ४० लाख रुपये चोरून गृहकर्जाचे हप्ते मुदतीआधीच भरले
Video : अभी तो पार्टी शुरू हुई हैं... देशवासियांच्या दुःखाचा पाढा वाचून मोदींवर ...
Today’s Horoscope : 'असा' असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन,...
ऐतिहासिक निर्णय! अविवाहित महिलेला 24 आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी