नवी दिल्ली l New Delhi :
आज (दि. 01) पासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. नवीन आर्थिक (Financial Year 22-23) वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकांना महागाईचा जबरदस्त झटका बसला आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात 250 रुपयांनी वाढ झाली आहे.
(LPG Gas Cylinder Price Hike) 19 किलोचा व्यवसायिक वापरासाठीचा सिलिंडर महागला. मुंबईत सिलिंडरचा दर 2205 रुपयांवर पोहोचला आहे. पेट्रोल, डिझेल (Petrol Diesel Price Hike) पाठोपाठ सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहक गॅसवर आहे.
Excellent news on the first day of financial year. Price of commercial gas cylinder up by whopping 250 rs. Imagine if medium size restaurant/ sweet shop uses two or 3 cylinder every day it means additional 750 rs per day increase monthly more than 20000 rs Wow! HAIL MODI! pic.twitter.com/YpvgO1jZnV
— mukeshmarda (@mukeshmarda) April 1, 2022
व्यवसायिक वापरासाठीच्या सिलिंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेलचे जेवण महागणार आहे. घरगुती वापरासाठीच्या सिलिंडरमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. 10 दिवसांपूर्वीच घरगुती वापरासाठीच्या सिलिंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहे. मुंबईत (Mumbai) आजपासून १९ किलोचा सिलिंडर 2205 रुपयांना मिळेल. कालपर्यंत हाच सिलिंडर 1955 रुपयांना मिळायचा.
पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; 20 किलो RDX अन् 20 स्लीपर सेल्स सज्ज
मुंबईसोबत सर्वच महानगरांमध्ये सिलिंडरचे दर वाढले आहे. दिल्लीत सिलिंडरचा दर 2203 रुपयांवरून 2253 रुपयांवर पोहोचला आहे. कोलकात्यात (Kolkata) सिलिंडरचा दर 2086 रुपयांवरून 2351 झाला आहे. चेन्नईत (Chennai) सिलिंडरसाठी 2406 रुपये मोजावे लागतील.
आधी इथे सिलिंडरचा दर 2138 रुपये होती. गेल्या दोन महिन्यांत सिलिंडरच्या दरात 346 रुपयांची वाढ झाली आहे. दि. 01 मार्चला सिलिंडरच्या दरात 105 रुपयांची वाढ झाली. दि. 22 मार्चला सिलिंडर 9 रुपयांनी स्वस्त झाला होता.
28 ची नवरी, 41 चा नवरदेव, दोघात 13 वर्षाचं अंतर जास्त नाही?, IAS Tina Dabi ने सांगितली त्रिसूत्री
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
आत्ताची प्रभाग रचना रद्द; आता 'इतके' सदस्य असणार; शिंदे सरकारचा 'मविआ'ला झटका
Yeola : येवल्यातील 'त्या' अफगाण धर्मगुरूच्या हत्येचा लागला छडा, चौघांपैकी एकाला ...
Fake Universities List : ‘तुम्ही प्रवेश घेतलेलं विद्यापीठ बनावट नाही ना?, UGC ने...
ओबीसी आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा; दोन आठवड्यात निवडणुका घ्या : SC