
मुंबई l Mumbai :
गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election 2022) भाजपने सर्वाधिक जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. या विजयाचे शिल्पकार असलेले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं मुंबईत आज जंगी स्वागत करण्यात आलं.
ढोल-ताशांच्या गजरात मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर सेलिब्रेशन (BJP celebration in Mumbai after wins Goa election 2022) करण्यात आलं. यावेळी भाषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेस (Congress) या तिन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे.
पुढची लढाई मुंबईत..
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. पण लढाई संपलेली नाही. कुठलाही विजय डोक्यात घालायचा नाहीये. अधिक मेहनत करायची आहे. आता खरी लढाई मुंबईत होणार आहे. मुंबईला कुठल्या पक्षापासून मुक्त करायचं नाहीये तर मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे. आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाहीत तर आम्ही भ्रष्टाचाराच्या (corruption) विरोधात मुंबईतील मैदानात उतरलो आहोत.
या मुंबई महानगरपालिकेला (Mumbai Municipal Corporation) जोपर्यंत भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढत नाहीत तो पर्यंत दम घेता येणार नाही. म्हणून हा विजय आज साजरा करा आणि उद्यापासून पुन्हा कामाला लागा. पुन्हा एकदा मुंबईचा प्रचंड विजय आणि महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज रहावं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोदी हैं तो…! पाच पैकी चार राज्यांत कमळाची कमाल, सायकल पंक्चर, हात अन् हत्ती दोन्हींची दाणादाण
गोव्यात भाजपच्या विजयात ‘सेने’चाच मोठा हात
देवेंद्र फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदीजींनी (Narendra Modi) जो विश्वास सामान्य माणसांत निर्माण केला तो विश्वास मतांमध्ये परिवर्तीत झाला. निकालापूर्वी काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांना पत्र दिलं की, आम्हाला बहुमत सिद्ध करण्यासाठी वेळ द्या पण ते चितपट झाले. महाराष्ट्रातून जी सेना गोव्यात पाठवली होती त्या सेनेमुळे गोव्यात भाजपला विजय मिळवून देण्यात त्या सेनेचा फार मोठा वाटा आहे. सेना म्हणजे भाजपचे सेना… दुसरी कुठली सेना नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, खरंतर मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की, त्यांची लढाई आमच्यासोबत नाही तर नोटा सोबत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्रित मते केली तरी नोटा पेक्षाही कमी आहेत. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या मतदारसंघात त्यांनी गर्जना केली होती की प्रमोद सावंत यांना पराभूत करु आणि त्या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराला केवळ 97 मते मिळाली.
या सेलिब्रेशन नंतर विधानभवनात आलेल्या देवेंद्र फडणवीस म्हणाले, या निवडणुकीने सिद्ध केले की लोकांच्या मनातला एकच नेता आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी. 37 वर्षांनंतर देशांतल्या सर्वात मोठ्या राज्यातील सरकार दुसऱ्यांदा येत आहे. सामान्य माणूस, गरीब जनता भाजपच्या पाठिशी आहे.
गोव्यातही आम्ही निवडून आलो आणि महाराष्ट्रातील जे पक्ष सिंहगर्जना करुन गोव्यात आमच्या विरोधात लढण्यासाठी आले होते त्यांची लढाई नोटाशी होती. शिवसेनेची सिंहगर्जना काही होऊ शकली नाही. भाजपला मिळालेला हा आनंद आम्ही साजरा करु आणि आजपासून पुन्हा कामाला लागू असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
INDIA trusts Hon PM @narendramodi ji !
We salute his supreme dedication, selfless service, pro-people, Garib Kalyan agenda & #NationFirst policy.
This has helped in @BJP4UP , @BJP4UK, @BJP4Manipur, @BJP4Goa victories!
We salute our great leader Hon Narendra Modi ji 🙏🏽 pic.twitter.com/KDBFmoUBnt— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 10, 2022