नाशिक l Nashik :
अवैध धंद्यांना आळा बसावा यासाठी नाशिक पोलीसांनी (Nashik Police) चांगलीच कंबर कसली असून अवघ्या दोन दिवसांत सहा ठिकाणी सुरू असलेल्या हुक्का पार्लर्सवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. (Nashik Police take action against six Hookah parlors)
गेल्या काही दिवसात शहरात खून (Murders), घरफोडी (Burglary), जबरी लूटमार (Robbery), चेन स्नचिंग (Chain Snatching) आदी घटना सर्रास घडताना दिसत आहेत. त्यात अमली पदार्थांची तस्करी, विक्री आदी प्रकार शहरातील बड्या हॉटेल्समध्ये रोजरोसपणे होत आहेत. या पार्श्वभूमीवर आता नाशिक पोलीस सरसावले आहेत.
Singer KK Death : ‘हम रहें या ना रहें कल, कल याद आयेंगे ये पल’; प्रसिद्ध गायक केके यांचे निधन
पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर पोलीस ठाणे (Gangapur Police Station) हद्दीतील सहा हॉटेल्सवर रात्रीच्या सुमारास छापा टाकून ही कारवाई केली आहे. यामध्ये हुक्का पार्लर मालक तथा हुक्का पिणाऱ्या 14 व्यक्तींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. सदर ठिकाणाहून तब्बल 64 हजार 390 रुपयांसह अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Nashik Police Commissioner Jayant Naiknavare), पोलीस उपायुक्त संजय बारकुंड (Deputy Commissioner of Police Sanjay Barkund), सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत मोरे (Assistant Commissioner of Police Vasant More) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट 01 व 02 च्या विजय ढमाळ, डाॅ. आंचल मुदगल, आनंद वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
‘हॉरर’ व्हिडिओ पाहून मुलाने आधी बाहुलीला फाशी दिली आणि मग…; काळजाचा ठोका चुकवणारी घटना
