…तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार; CM उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे LIVE : राजीनामा देण्याची शक्यता l Chief Minister Uddhav Thackeray LIVE Maharashtra
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे LIVE : राजीनामा देण्याची शक्यता l Chief Minister Uddhav Thackeray LIVE Maharashtra
Share on Social Sites

एकनाथ शिंदे गटाचं अखेर ‘हे’ नाव ठरलं! थेट सेनेच्या अस्तित्वाला आव्हान

मुंबई l Mumbai (ई खबरबात न्यूज नेटवर्क) :

मी मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसल्याचे बंडखोरांनी समोर येऊन सांगावे. मी राजीनामा द्यायला तयार आहे. आजच मातोश्रीवर (Matoshri) मुक्काम हलवतो, असे म्हणत आज बुधवारी (दि. 22) मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Chief Minister and Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी बंडखोरांना साद घातली. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरेंनी आपली भूमिका फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून स्पष्ट केली. आता यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काय बोलतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. शिंदे सायंकाळी सात वाजता गुवाहटीत (Guwahati) पत्रकार परिषद घेणार आहेत.

https://www.facebook.com/UddhavBalasahebThackeray/videos/357236179875942

आम्ही कदापी ‘हिंदुत्व’ सोडले नाही

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, शिवसेना (Shiv Sena) आणि हिंदुत्व एकमेकांशी जोडलेले शब्द आहेत. हे दोन्ही शब्द कदापिही एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी आदित्य (Aditya Thackeray), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सारे अयोध्येला (Ayodhya) गेले. मात्र, ही हिंदुत्वावार (Hindutva) बोलण्याची वेळ नाही. मग नेमके झाले काय, ही शिवसेना कोणाची. काही जण ही बाळासाहेबांची (Balasaheb) शिवसेना राहिलेली नाही म्हणतात हे ठीक आहे. असं मी काय केलं, असा सवाल त्यांनी केला.

https://twitter.com/ANI/status/1539586025705861120?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1539586025705861120%7Ctwgr%5Ehb_0_10%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fpudhari.news%2Fmaharashtra%2Fmumbai%2F237541%2Fuddhav-thackeray-ready-to-resigns-but%2Far

ही कसली लोकशाही?

उद्धव ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांचे जे विचार होते, तेच मी पुढे नेतोय. 2014 साली प्रतिकूल परिस्थितीत 63 आमदार (MLA) निवडून आणले. पहिल्या प्रथम शिवसेना कोणाची, हिंदुत्व सोडले का, मधल्या काळात जे काही दिले, ते बाळासाहेबानंतर शिवसेनेने दिले. सध्या राज्यात काय चाललंय. काही सूरतला (Surat) गेले. त्यानंतर गुवाहटीला गेले. काल परवा विधान परिषदेची निवडणूक (Legislative Council elections) झाली. या निवडणुकीच्या अधल्या दिवशी सगळे आमदार हॉटेलमध्ये होते. मी तिकडे गेलो. ज्यांना आपले मानतो. आपली माणसं यांना एकत्र ठेवावे लागते. शंका ठीक आणि लघुशंकेला गेले तर शंका, ही कसली लोकशाही, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढे काय?, खरंच विधानसभा बरखास्तीच्या दिशेने?; जाणून घ्या महाराष्ट्राची पुढच्या राजकारणाची दिशा!

माझ्याच लोकांना मी नको…

ठाकरे पुढे म्हणाले की, साधा महापालिकेत उभा न राहिलेला माणूस मुख्यमंत्री कसा होणार, हा प्रश्न मी पवारांना विचारला. पण त्यांनी आग्रह केला. मग म्हटलं, ठीक आहे होऊयात. राजकारण हे राजकारण असलं पाहिजे. वळणदार राजकारण रडकुंडीच्या घाटासारखं असू नये. प्रशासनाने मला सांभाळून घेतलं. मला धक्का कशाचा बसला आहे? तर काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीने (NCP) म्हटले की, आम्हाला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) नकोयत, तर एक वेळ ठीक आहे. आज कमलनाथ (Kamal Nath) यांनी स्वत: फोन करून म्हटले की, उद्धवजी आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण माझ्याच लोकांना मी नको आहे, त्याला काय म्हणावं, असा सवालही त्यांनी केला.

‘देवेंद्रनीतीचा’ पुन्हा विजय! विधान परिषद निवडणुकीत राज्यसभेसारखीच कमाल, भाजपचे पाचही उमेदवार विजयी

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ

उद्धव म्हणाले की, आजही या लोकांपैकी एकानेही सांगितले की, उद्धवजी आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नको आहात, तर मी आजच वर्षा सोडून मातोश्रीवर जायला तयार आहे. त्यांनी हे समोर येऊन बोलावे. उगाच शिवसेनेला आम्ही सोडणार नाही. हिंदुत्वाचा मुद्दा असे याच्या-त्याच्या पाशी सांगू नये. मी सत्तेला चिकटून बसणारा माणूस नाही. मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे. मला सत्तेचा मोह नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी एक म्हण आहे, तशीच परिस्थिती आता आली आहे, असा सूचक उल्लेख त्यांनी केला.

https://twitter.com/ANI/status/1539594117608779782

See also  Tomato Fever : सावधान! 'स्वाईन फ्लू'सोबत आता 'टोमॅटो फिवर'चा ही धोका वाढला; 'अशी' घ्या काळजी

तुम्हीच राजीनाम्याचे पत्र घ्या

उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या लोकांना मी नको असेल, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. गायब आमदारांनी इथे यावे आणि माझ्या राजीनाम्याचे पत्र घेऊन राजभवनात (Raj Bhavan) जावे. कारण, मला कोविड झालेला आहे. जर राज्यपालांनी मला बोलवले, तर मीही राजभवानात जाण्यास तयार आहे. म्हणून पुन्हा सांगतो की, कुठेही आगतिकपणा नाही, लाचारीचा प्रसंग नाही, मजबुरी तर अजिबात नाही, कारण आजपर्यंत अशी अनेक आव्हानं बिनसत्तेची पेलली आहेत. होऊन होऊन काय होईल. पुन्हा लढू. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले शिवसैनिक (Shiv Sainik) आहेत. तो पर्यंत संकटाला भीत नाही. मी आव्हानाला समारे जाणारा माणूस असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

https://twitter.com/shivchaudhary0/status/1539596069465559040

पक्षप्रमुखपदही सोडायला तयार

उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या शिवसैनिकांना वाटत असेल, मी शिवसेनेचं नेतृत्त्व करायला नालायक आहे, तर हेही पद सोडायला तयार आहे. पण हे सांगायला विरोधक नको, शिवसैनिक हवा. कारण मी शिवसैनिकाला बांधील आहे. मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे, असे आवाहन त्यांनी केले. मी पद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंदाने मान्य आहे. फक्त हे मला समोर येऊन सांगा. म्हणून इकडे या किंवा फोन करून सांगा. तुम्ही आम्हाला नको आहात हे स्पष्ट सांगा. मी या क्षणाला मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे. पदे ही येतात-जातात. आयुष्याची कमाई काय तर, पदावरून तुम्ही काय काम करता आणि त्यातून जनतेची प्रतिक्रिया, ही कमाई आहे. लोक म्हणतात की आम्हाला वाटतं की आमच्या कुटुंबातले वाटतात असे लोक म्हणतात. हीच माझ्या आयुष्याची कमाई असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

See also  4 तारखेपासून ऐकणार नाही, शरद पवार, भोंगे अन् बरंच काही... वाचा राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  'त्यांचा' सत्तेचा फॉर्म्युला ठरलायं! 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्री पदे, केंद्रातही वाटा अन् बरचं काही...

Share on Social Sites