देशात कोरोना (Corona), मंकीपॉक्स (Monkeypox) आणि स्वाईन फ्लूने (Swine Flu) टेन्शन वाढवलं आहे. त्यापाठोपाठ आता टोमॅटो फ्लूनं (Tomato Flu) आरोग्य विभाग आणि प्रशासनाची झोप उडवली आहे. दक्षिण भारतात (South India) टोमॅटो फिवरचा धोका वाढत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) अजूनतरी एकाही रुग्णाची नोंद करण्यात आली नाही. मात्र महाराष्ट्रा शेजारील राज्यात टोमॅटो फिवरचे (Tomato Fever) रुग्ण आढळल्याने धोका आहे. (Tomato Flu latest news in Marathi)
केरळ (Kerala) आणि ओडिशामध्ये (Odisha) आतापर्यंत 80 हून अधिक मुले या आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (Union Ministry of Health and Family Welfare) म्हणण्यानुसार, केरळमधील कोल्लम जिल्ह्यात (Kollam district, Kerala) दि. 6 मे रोजी ‘टोमॅटो फ्लू’ची प्रथम ओळख झाली होती. दि. 26 जुलै पर्यंत 82 हून अधिक मुलांमध्ये संसर्ग झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
देशभरात #TomatoFlu ची जोरदार चर्चा सुरू आहे. @MoHFW_INDIA च्या नुसार ‘टॉमेटो फ्लू' म्हणजे लहान'हॅंड फूट माऊथ' (HFMD) आजार आहे.
केरळमध्ये याला 'तक्काली पनी' म्हणतात. ज्याचा इंग्रजीत अर्थ होतो 'टॉमेटो फ्लू'. पाहा @bbcnewsmarathi
pic.twitter.com/FtSoXU9trq@MahaHealthIEC
— Mayank Bhagwat (@mayankbhagwat) August 25, 2022
तमिळनाडू (Tamil Nadu) आणि कर्नाटक (Karnataka) राज्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या आजाराचा धोका 10 वर्षांच्या आतील मुलांना सर्वात जास्त आहे. तर या मुलांच्या संपर्कात येणाऱ्यांना आजाराचा संसर्ग होऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे.
Tomato Flu cases have surged in India, more than three months after its inception.
We are sure that many are concerned. Hence, here’s all that one needs to know about it. #TomatoFlu #TomatoFluAwareness #TomatoFluVirus #TomatoFluSymptoms #AsterBangalore #AsterHospital pic.twitter.com/16nBFYV1iI
— Aster Hospitals, Bangalore (@asterbangalore) August 25, 2022
‘टोमॅटो फ्लू’ विषयी काय काळजी घ्यायची? (What to do about Tomato Flu?)
- शक्य तेवढं भरपूर पाणी प्या तसेच इतर द्रव पदार्थाचं सेवन जास्त करा (Drink as much water as possible and increase the intake of other liquids)
- मोठ्यांसह मुलांच्या स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे (It is very important to take care of the hygiene of children as well as adults)
- अंगावर कुठे फोड आले असतील तर त्यांना कॉटनच्या रुमालाने हळूवार पुसा (If there are blisters on the body, wipe them gently with a cotton handkerchief)
- संशयास्पद प्रकरणांमध्ये, सुरक्षित अंतर ठेवा आणि डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या (In suspicious cases, keep a safe distance and consult a doctor)
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच बाधित मुलाची व्यवस्थित काळजी घ्या (Take proper care of the affected child as per the doctor’s advice)
- मुलांसाठी असलेल्या सर्व लसी वेळेत द्या, जेणेकरून रोगांचा धोका उद्भवणार नाही (Give all vaccinations for children on time, so that there is no risk of diseases)
- या काळात ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी (Those who have weak immune system should take special care during this period)
- सकस आहार घ्या, योगा- प्राणायाम करा आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करा (Eat healthy food, do yoga- pranayama and try to keep yourself fit)