बजाज ऑटोचा आधारवड काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे निधन

बजाज ऑटोचा आधारवड काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे निधन l Bajaj group's former chairman Rahul Bajaj passes away Pune
बजाज ऑटोचा आधारवड काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे निधन l Bajaj group's former chairman Rahul Bajaj passes away Pune
Share on Social Sites

पुणे l Pune :

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे आज (दि. १२) रोजी पुण्यात निधन झाले आहे. (Senior industrialist Rahul Bajaj passed away in Pune) वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास सोडला. त्यांच्या निधनामुळे बजाज उद्योग समूहचा (Bajaj Industry) मोठा आधारस्तंभ हरपला आहे.

आजारपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic, Pune) ते मागील काही दिवसांपासून दाखल होते. वयोमान आणि हृदयाच्या आजारामुळे त्यांच्यावर उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. अखेर आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांचे मल्टी ॲार्गन फेल्यूअरमुळे (multi-organ failure) निधन झाले.

राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली झाला होता. बजाज उद्योग समूहाला मोठे करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. २००१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ (Padma Bhushan) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र (Economics) आणि विधीमध्ये (Law) पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून, त्यानंतर हॉवर्ड विद्यापीठातून (Howard University) MBA चे देखील शिक्षण घेतले होते. १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये ते कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाले होते.

मागील वर्षीच त्यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. जवळपास पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. बजाज ऑटोला यशोशिखरावर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नीरज बजाज यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली होती. राहुल बजाज यांच्या जाण्याने उद्योग जगताची मोठी हानी झाली आहे. सर्वचस्तरातून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.

See also  यशवंत जाधव यांचे ‘मातोश्री’ प्रेम डोळ्यात पाणी आणणारे; २ कोटी, ५० लाखांचे घड्याळ भेट

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  लवकरच बस हवेत उडताना दिसणार, गडकरींचे भरसभेत जनतेला आश्वासन

Share on Social Sites