नाशिक l Nashik :
जिह्यातील पेठ (Peth Taluka) व त्र्यंबक तालुक्याला (Trimbak Taluka) जोडणाऱ्या रस्त्यापासून तीन किलाेमीटवरील पिंपळवटी ग्रामपंचायत (Pimpalvati Gram Panchayat) अंतर्गत येणाऱ्या करंजपाडा (Karanjpada) ग्रामस्थांना रस्त्याविना अजूनही विकासा पासून कोसो दूर असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होत आहे.
सार्वजनिक शौचालय तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी; श्रमजीवी संघटनेचे अकोले पंचायत समितीला निवेदन
२५० ते ३०० लोकसंख्या असणारा हा आदिवासी पाडा हरसूल पेठ (Harsul-Peth) मार्गावरील बोरपाडापासून (Borapada) अडीच किलाेमीटरवर आहे. पावसाळाभर या गावाला नदीने वेढलेले असते. करंजपाडा येथून हरसूलला रुग्ण घेऊन जाताना खरपडीपर्यंत (Kharpadi) डोलीचा सहारा घेत नाला पार करावा लागतो.

रुग्णांसह विद्यार्थी व ग्रामस्थांना विविध कामांकरिता बाजारात येण्यासाठी रस्ता नसल्याने आदिवासी बांधवांचे हाल होत आहे. इमारतही नसल्याने ओट्यावर अंगणवाडी भरवावी लागते. माेबाईलला रेंज मिळत नसल्याने शैक्षणिक कामांसह रेशनचे धान्य पिंपळवटी (Pimpalvati) येथे घेेण्यासाठी १० ते १२ किमी अंतर पार करावे लागते.
