बापरे! 15 दिवसांत 3 बंगाली अभिनेत्रींची आत्महत्या, नेमकं काय घडलं?

बापरे! 15 दिवसांत 3 बंगाली अभिनेत्रींची आत्महत्या, नेमकं काय घडलं? l 3 Bengali Actresses commited suicide in last 15 days
बापरे! 15 दिवसांत 3 बंगाली अभिनेत्रींची आत्महत्या, नेमकं काय घडलं? l 3 Bengali Actresses commited suicide in last 15 days
Share on Social Sites

आर्यन खान सुटला! NCB म्हणतेय आर्यनकडे ‘ड्रग्ज’च नव्हते

मुंबई l Mumbai :

लडाखमध्ये 7 जवानांना वीरमरण

बंगाली सिनेसृष्टीत आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कोलकाता (Kolkata) येथे आणखी एका मॉडेलनं आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली आहे. मंजूषा नियोगीचा (Manjusha Neogi) मृतदेह तिच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला आहे. अद्याप मंजूषाच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. बंगाली सिनेसृष्टीत नेमकं काय चाललंय तरी काय असा प्रश्न आता उभा राहू लागला आहे. (3 Bengali Actresses commited suicide in last 15 days)

मागील 3 दिवसांत दुसऱ्या अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसांत कोलकाता येथे चक्क 3 अभिनेत्रींचा मृत्यू झाला आहे. या घटनांनी बंगाली सिनेसृष्टी पूर्ती हादरली आहे. सुरुवातीला छोट्या पडद्यावरील अभिनेत्री पल्लवी डे (Pallavi Dey) हिचा मृत्यू झाला होता. दि. 15 मे रोजी पल्लवीचा मृतदेह राहत्या घरी गळफास घेतलेला आढळला. पल्लवीच्या कुटुंबाने याबाबत हत्येचा गुन्हा पोलीस ठाण्यात नोंदवला. त्यामुळे पल्लवीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडला पोलीसांनी अटक केली.

अभिनेत्री विदिशाच्या मृत्यूचा तपास सुरू (Investigation into Actress Vidisha’s death begins)

पल्लवीच्या मृत्यूनंतर 2 दिवसांनी उत्तर कोलकाता येथे मॉडेल अभिनेत्री विदिशा डे मजुमदार (Vidisha De Majumdar) हिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. विदिशानं एक सुसाइड नोटही लिहिली होती. माझ्या मृत्यूसाठी कुणाला जबाबदार धरू नका असं त्यात म्हटलं होते. पोलीसांनी विदिशाच्या मृत्यूबाबत गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे. अभिनेत्रीचे तिच्या बॉयफ्रेंडशी संबंधांबाबत चौकशी सुरू आहे. बॉयफ्रेंडमुळे ती मानसिक तणावाखाली होती असं तिचे मित्र म्हणतात. विदिशाने तिच्या सुसाइड नोटमध्ये तिला कॅन्सर (Cancer) असल्याचं म्हटलं परंतु तो नव्हता असं चौकशीतून समोर आले.

विशेष म्हणजे, या दोन्ही तपासात एक साम्य म्हणजे मंजूषा नियोगी आणि विदिशा (Manjusha Niyogi and Vidisha De) दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या. मंजूषाच्या आईनं सांगितले की, विदिशाच्या मृत्यूनंतर मंजूषा मानसिक तणावाखाली होती. मंजूषाचा मृतदेह पोलीसांनी पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. मंजूषा आणि विदिशा या दोघींच्या मृत्यूमध्ये काही कनेक्शन आहे का? या दोघींच्या मृत्यूमागं कुठलं रहस्य दडलं आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलीस संबंधित तपास करत आहे.

महाराष्ट्रातील भाविकांचा उत्तरकाशीला भीषण अपघात! बोलेरो दरीत कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, 10 जखमी

See also  बंडखोर नेता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, कौटुंबिक कलहासह 'या' कारणाने खून?

Share on Social Sites