नवी दिल्ली । New Delhi :
राजधानी दिल्लीतील कस्तुरबा नगरमध्ये (Kasturba Nagar) महिलेसोबत भयंकर वर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे. एका २० वर्षीय विवाहित महिलेला पकडून गर्दीत तिचा विनयभंगही करण्यात आला.
या महिलेवर सामूहिक बलात्कार (Woman Gang Rape) झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पकडून तिचे मुंडन करण्यात आले. एवढेच नाही तर तिच्या तोंडाला काळे फासण्यात आले आणि चपलांचा हार घालून रस्त्यावर धिंड काढली. महिलेच्या लहान बहिणीने पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला वाचवले. तिचे समुपदेशन केले जात आहे.
कस्तूरबा नगर में 20 साल की लड़की का अवैध शराब बेचने वालों द्वारा गैंगरेप किया गया, उसे गंजा कर, चप्पल की माला पहना पूरे इलाक़े में मुँह काला करके घुमाया। मैं दिल्ली पुलिस को नोटिस जारी कर रही हूँ। सब अपराधी आदमी औरतों को अरेस्ट किया जाए और लड़की और उसके परिवार को सुरक्षा दी जाए। pic.twitter.com/4ExXufDaO3
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) January 27, 2022
बहिणीच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्कार आणि इतर कलमांतर्गत एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला. महिलेसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली चार महिलांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
पूर्ववैमनस्यातून महिलेसोबत हे वर्तन केल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित महिला विवाहित आहे. तिला एक मूलही आहे. शेजारी राहणारा एक मुलगा आपल्या बहिणीच्या मागे पडला होता. नंतर त्या मुलाने दि. १२ नोव्हेंबरला आत्महत्या केली होती. आपल्या बहिणीमुळेच मुलाने आत्महत्या केल्याचे मुलाच्या कुटुंबीयांना वाटते आहे, असे पीडितेच्या बहिणीने म्हटले आहे.
महिला आयोगाकडून दखल (Women’s Commission take a Note)
दिल्ली महिला आयोगाने (Delhi Women’s Commission) या प्रकरणाची दखल घेतली आहे. आयोग दिल्ली पोलिसांना याप्रकरणी नोटीस देखील जारी करेल. अवैध दारू विक्रेत्यांनी महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang-Rape) केला, असे आयोग प्रमुख स्वाती मालीवाल (Swati Maliwal, head of the commission) यांनी सांगितले.