
नवी दिल्ली l New Delhi :
सध्या राज्यासह देशात उन्हाचा चटका वाढला आहे. दिवसेंदिवस तापमानात देखील वाढ होत आहे. अशातच देशवासियांसाठी एक आनंदवार्ता आली आहे. यावर्षी देशात जवळपास 10 दिवस आधीच मान्सून (Monsoon 2022) दाखल होणार आहे. (This year Monsson will arrive 10 days earlier on the Kerala Coast according to European Center for Medium range weather)
मान्सून दि. 20 किंवा दि. 21 मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर (Kerala coast) धडकणार आहे. त्यानंतर तो पुढील काही दिवसात देशाच्या उर्वरित भागात बरसणार असल्याचा अंदाज यूरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्ट, European Centre for Medium-Range Weather Forecast) या संस्थेने वर्तवला आहे.
https://twitter.com/itsashishjain/status/1522271959236546573
मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर दाखल होणार असल्याने ही शेतकर्यांसह नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. तसेच पिकांनाही पाण्याची गरज आहे, त्यामुळे अशा काळातच पाऊस पडणार असल्याने शेतकर्यांना हा दिलासा म्हणावा लागेल.
दरम्यान, दरवर्षी मान्सून जूनच्या (June) पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होतो. यंदा दहा दिवस आधीच मान्सूनची बरसात सुरु होणार आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलानुसार सध्या अरबी समुद्रात अँटी-सायक्लोन (Anti-cyclone zone in Arabian Sea) क्षेत्र तयार होत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे मान्सून केरळमध्ये लवकर पोहचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1522088306837581825
यंदा 99 टक्के पाऊस होणार (It will rain 99 percent this year)
दरम्यान, यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज दि. 14 एप्रिलला जाहीर केला होता. त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशात चांगला पाऊस राहणार असल्याने शेतकर्यांना एका प्रकारचा दिलासा मिळाला आहे. यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असल्याने ही शेतकर्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण दरवर्षी शेतकर्यांना भारतीय हवामान विभागाच्या (Indian Meteorological Department) अंदाजाची प्रतिक्षा असते. त्यामुळे सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. हवामान विभागाने अंदाज जाहीर केल्यानंतर आता युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फॉरकास्ट या संस्थेने दहा दिवस आधीच मान्सून दाखल होणार असल्याचे म्हटले आहे.
Ahmednagar Accident : कंटेनर-रिक्षाच्या धडकेत 6 जण जागीच ठार; 4 गंभीर जखमी