ICAI CA चा फायनल निकाल जाहीर; कसा तपासाल निकाल? जाणून घ्या

ICAI CA Final Result
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

सीएचा (Chartered Accountant CA) अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. आयसीएआय (Institute of Chartered Accountants of India ICAI) ने, CA अंतिम निकाल (ICAI CA Result 2022) आज घोषित केला आहे.

विद्यार्थ्यांना हा निकाल अधिकृत वेबसाइट्स icai.nic.in, caresults.icai.org आणि icaiexam.icai.org वर जाऊन तपासता येणार आहे. सीएची अंतिम परीक्षा दि. 14 ते दि. 29 मे 2022 या कालावधीत घेण्यात आली. ही परीक्षा देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आली.

कसा तपासणार निकाल?

ICAI CA निकाल 2022 अधिकृत वेबसाइट्स icai.nic.in, caresults.icai.org आणि icaiexam.icai.org वर जाऊन सहज तपासता येणार आहे. सीए अंतिम परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांनी रोल नंबरसह त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा पिन वापरून लॉग इन करणे आवश्यक आहे. यावर्षी, मे सत्रासाठी ICAI CA अंतिम परीक्षा दि. 14 ते दि. 30 मे दरम्यान घेण्यात आली. ICAI CA अंतिम निकाल 2022 याप्रमाणे तपासण्यात सक्षम असेल.

https://twitter.com/theicai/status/1547767167323541504

असा तपासा निकाल (Check the result ICAI)

  1. सर्वप्रथम icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  2. त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या “ICAI CA मे 2022 चा निकाल” या लिंकवर क्लिक करा.
  3. आता रोल नंबरसह तुमचा नोंदणी क्रमांक किंवा पिन सबमिट करा.
  4. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  5. आता तुमचा निकाल तपासा.

https://twitter.com/raj122_raj/status/1547771210934923264

See also  'आप'ची 'मान' उंचावणारा Punjab King; कॉमेडियन टू CM कसा आहे 'भगवंत' यांचा प्रवास

फाउंडेशन परीक्षा (Foundation Exam)

CA चे काम आर्थिक खाती तयार करणे, आर्थिक सल्ला देणे, लेखापरीक्षण खात्यांचे विश्लेषण करणे आणि कर संबंधित काम करणे आहे. कर भरणा देखील सीएची जबाबदारी आहे. सीए होण्यासाठी ICAI च्या सीए अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा लागतो. बारावीनंतर विद्यार्थी सीएच्या प्रवेश परीक्षेला बसू शकतात. कोणत्याही शाखेतून (कला, विज्ञान, वाणिज्य) बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ही प्रवेश परीक्षा देऊ शकतात. त्याला फाउंडेशन परीक्षा म्हणतात.

https://twitter.com/Priyanka_Rathi_/status/1547785564258463745

See also  Nashik Municipal Election 2022 : निवडणुकीचा धुराळा उडणार; नाशिक महापालिकेची 'अशी' असेल प्रभाग रचना

Share on Social Sites