
इस्लामाबाद l Islamabad :
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये जामा मशीदीमध्ये आज आत्मघाती हल्ला झाला. (Jama Masjid, Peshawar, Pakistan) यामध्ये ३६ लोकांचा मृत्यू झाला आहे. नमाज पठणावेळी आलेल्या गर्दीला लक्ष्य करण्यात आले. या घटनेमध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
जखमींना पेशावरच्या लेडी रीडिंग हॉस्पिटलमध्ये (Lady Reading Hospital) भरती करण्यात आले आहे. स्फोटानंतर मदतीला पोहोचलेल्या लोकांनी जखमींना मोटरसायकल, कारमध्ये घालून हॉस्पिटलमध्ये पोहोचविले. एका बातमी नुसार पोलीस आणि सुरक्षा दलांनी घटनास्थळाला वेढले आहे. लेडी रीडिंगच्या हॉस्पिटल प्रवक्त्याने सांगितले की, १० जखमींची हालत अति गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे.
https://twitter.com/ANI/status/1499678646348713986
पेशावरची राजधानी शहराचे पोलीस अधिकारी (Peshawar’s capital city police officer (CCPO) एजाज अहसान (Ejaz Ahsan) यांनी या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. लेडी रीडिंग हॉस्पिटलचे मीडिया मॅनेजर असीम खान यांनी सांगितले की, आता पर्यंत ३६ मृतदेह हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहेत.
अहसान यांनी सांगितले की, सुरुवातीच्या वृत्तानुसार पेशावरचा भाग ख्वानी बाजारात (Khwani Bazar) दोन हल्लेखोरांनी मशीदीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी मशीदीच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांवर गोळीबार केला. या घटनेत एक पोलीस मारला गेला आहे. तर दुसरा गंभीर जखमी आहे.
OBC Reservation : ओबीसी आरक्षणावर विधासभेत बिल आणणार; अजित पवारांची घोषणा