२०२२ वर्षाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात एकूण १२८ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहे l Padma Awards 2022
Share on Social Sites
नवी दिल्ली l New Delhi :
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस म्हणजेच आज (दि. २५ जानेवारी) २०२२ वर्षाच्या पद्म पुरस्कारांची (Padma Awards 2022) घोषणा करण्यात आली आहे. यात एकूण १२८ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
यामध्ये सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat), कल्याण सिंह (Kalyan Singh) आणि राधेश्याम खेमका (Radheshyam Khemka) यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कारही जाहीर झाला आहे.
तर, कला क्षेत्रात प्रभा अत्रे (Prabha Atre) यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे (Ayurvedacharya Balaji Tambe.) यांना पद्मश्री पुरस्कार (Padma Shri award) जाहीर झाला आहे.
पद्मविभूषण पुरस्कार (Padma Vibhushan Award:) :
प्रभा अत्रे (कला), बिपीन रावत (मरणोत्तर), कल्याण सिंह (मरणोत्तर) आणि राधेश्याम खेमका(मरणोत्तर)
पद्मभूषण पुरस्कार (Padma Bhushan Award) :
सायरस पुनावाला (व्यापर आणि उद्योग) , नटराजन चंद्रशेखरन (व्यापर आणि उद्योग), सत्या नाडेला, सुंदर पिचई, काँग्रेस नेते गुलामनबी आझाद
पद्मश्री पुरस्कार (Padma Shri Award) :
बालाजी तांबे, विजयकुमार डोंगरे, सुलोचना चव्हाण, नीरज चोप्रा, डॉ. हिंमतराव बावसकर, सोनू निगम, अनिल राजवंशी, भिमसेन सिंगल, वंदना कटारिया आदींचा समावेश आहे.