
पुणे l Pune :
राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे (MP Sambhaji Raje) यांच्या सहा वर्षांच्या कारकिर्दीची मुदत संपल्यानंतर त्यांनी आज (दि. 12) आपल्या पुढील प्रवासाची दिशा ठरवली आहे. राज्यसभेची निवडणूक (Rajya Sabha election) अपक्ष म्हणून लढवणार असून ‘स्वराज्य’ नावाच्या संघटनेची (Swarajya Party) स्थापन करणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी केली आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबतची माहिती दिली.
यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; महाराष्ट्रातील पाचजण जागीच ठार, 2 गंभीर
“समाजाला दिशा देण्यासाठी आणि समजाच्या हितासाठीच मी आजवर भूमिका घेत आलो आहे. सहा वर्षात मी कुठेही राष्ट्रपती नियुक्त खासदाराची प्रतिष्ठा धुळीस मिळेल असं वागलेलो नाही. जनसेवा करायची असेल तर राजसत्ता देखील महत्वाची आहे. त्यामुळे जुलैमध्ये राज्यसभेच्या 6 जागा रिक्त होत आहेत. यात मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे”, अशी घोषणा संभाजीराजे यांनी यावेळी केली. त्यांनी यावेळी सर्वपक्षीय नेत्यांना पाठिंबा देण्याचं आवाहन देखील केलं.
खळबळजनक! पुण्यात किडनी रॅकेटचा पर्दाफाश, ‘रुबी’च्या 15 डॉक्टरांवर गुन्हा दाखल
“महाराष्ट्राच्या जनतेनं छत्रपती घराण्याला आजवर खूप प्रेम केलं. सत्तेत राहून मी अनेक कामं करू शकलो. समाजहित ज्यात असेल त्याची बाजू मी घेत आलो आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असो किंवा भाजपा (Bhartiya Janta Party (BJP) असो. ज्यावेळी समाजहित मला जिथं दिसलं तिथं मी बाजू मांडत आलो आहे. त्यामुळे माझं सर्व पक्षीय नेत्यांना आवाहन आहे की, त्यांनी मला पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्यासाठी सहकार्य करावं”, असं संभाजीराजे म्हणाले.
https://twitter.com/vaibhavasks/status/1524647870518874113
आजपासून मी कुठल्याही पक्षाचा नाही!
“मला विश्वास आहे की छत्रपतींच्या घराण्यातील एकमेव माणूस म्हणून मी समाजहितासाठी कामं करतोय. मी आजपासून कुठल्याही पक्षात नाही. मी अपक्ष म्हणून निवडणुकीसा सामोरं जाणार आहे. मी कुठल्याही पक्षात जात नाहीय”, असं संभाजीराजे यांनी यावेळी जाहीर केलं.
https://www.facebook.com/YuvrajSambhajiraje/videos/417647596488013