
नवी दिल्ली l New Delhi :
गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाची (Corona Virus) स्थिती अधिक गंभीर होत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या राज्यसह देशात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दरदिवशी तब्बल ३ लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत.
इतकेच नव्हे, तर कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे (Corona Omicron Variant) रुग्णही वाढत आहेत. यावर कोरोना लसीकरण (Corona Vaccination) हाच ऐकमेव उपाय असल्यामुळे देशभरात यावर भर दिला जात आहे. यातच केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासंदर्भात (Corona Vaccination) नव्या गाइडलाइन्स जारी केल्या असून, त्यामध्ये बुस्टर डोसबाबतही (Booster Dose) मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहे.