Ganesh Chaturthi 2022 : कधी आणि कशी कराल गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना; जाणून घ्या पूजा तयारी, शुभ मुहूर्त, विधी आदींबाबत

Ganesh Chaturthi Muhurth and Vidhi
Share on Social Sites

मुंबई । Mumbai :

गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi 2022) दरवर्षी गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केली जाते. गणेशभक्त दरवर्षी गणेशोत्सव सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन (Ganesh Chaturthi Muhurat 2022 in Marathi) उद्या होणार आहे. सर्वच घरात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. सर्वांचा आवडता गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

सलग 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवात दररोज गणपत्ती बाप्पाची (Ganpati Bappa Morya) मनोभावाने पुजा केली जाते. यंदा तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणणार असाल तर गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेचा (Ganesh Murti Pratishthapana Muhurat Vidhi) नेमकं काय आहे शुभ मुहूर्त हे जाणून घ्या…

तज्ञ पंडितांच्या मते, गणेश उत्सव कृषी संस्कृतीचे मोठे प्रतीक आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक जण आप-आपल्या शेतातल्या माती पासून गणपतीची मूर्ती बनवत असे आणि हा सण साजरा करत असे. चातुर्मास (Chaturmas) सुरु झाल्यानंतर 45 दिवसांनी भाद्रपद चतुर्थीच्या (Bhadrapada Chaturthi) दिवशी गणेशोत्सव सुरू होतो. या उत्सवात भाविक मोठ्या प्रमाणात सामील होतात. हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर (Maharashtra) साजरा केला जातो.

Ganesh Chaturthi 2022 : बाप्पांच्या आगमनासोबतच होत आहे शुक्राचे गोचर, ‘या’ चार राशींवर असते गणरायाची विशेष कृपा

कोणत्या वेळी करावी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना

गणेश चतुर्थीच्या दिवशी बुधवारी (दि. 31ऑगस्ट) ब्रह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे उठून अभ्यंगस्नान करून 04 वाजून 48 मिनिटे ते दुपारी 01 वाजून 54 मिनिटांपर्यंत घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना मध्यान्हानंतर गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करता येऊ शकेल. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पहाटेच्या ब्राह्म मुहूर्तापासून ते दुपारी 1 वाजून 54 मिनिटांपर्यंत प्रत्येकाला आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन करता येईल. त्याकरिता भद्रादी कोणतेही कुयोग वर्ज्य करण्याची किंवा विशिष्ट मुहूर्त वेळेची आवश्यकता नाही.

दरम्यान, सकाळी आणि संध्याकाळी न चुकता आरती म्हणावी. यावेळी “ओम गं गणपतये नमः” या मंत्राचा एका मिनिटांमध्ये कमीत कमी सात ते आठ वेळा उच्चार करावा व आपल्याला जमेल तेवढा वेळ देवाची भक्ती भावाने पूजा करावी. तसेच जेवढे दिवस आपल्याकडे गणपती आहे तेवढे दिवस सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेला पूजा आणि आरती करावी. गणपतीला नैवेद्य म्हणून आपल्या चालीरीतीनुसार गोडधोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करावेत. गणपतीला दुर्वा, जास्वंदाची फुले किंवा लाल फुले आवडतात. त्यामुळे ते देखील गणेशाला अर्पण करावेत.

अशी करा पूजेची तयारी

गणेशाची छोटी मूर्ती, श्रीफळ, कापड, कापसाची माळा, हार, सुट्टी फुले व नाणी, अत्तर, गूळ-खोबरे, सुपारी, देठाची पाने, मिठाई, मोदक, कापसाचे वस्त्र, अगरबत्ती, कापूर, दूर्वा, हळदी-कुंकू-अबीर-गुलाल, दिवा, तेल, समई, वाती, फळे, पंचामृत, नैवेद्य, चंदन, अष्टगंध, पळी, पंचपात्र, जानवे, शमीपत्रे, आंब्याची डहाळी, ताम्हण, कलश, शंख, घंटा, अक्षता आदी साहित्य लागतात.

दि. 09 सप्टेंबरला दिवसभर विसर्जन मुहूर्त

यावर्षी अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) शुक्रवारी (दि. 09 सप्टेंबर) आहे. दहा दिवसांच्या गणपतींचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशाचे विसर्जन यादिवशी दिवसभरात केव्हाही करता येईल. पुढील वर्षी (दि. 19 सप्टेंबर) रोजी गणरायाचे आगमन होणार आहे.

गणेश मूर्ती शेतातील मातीचीच असावी

हा गणेशोत्सव पार्थिव गणेशोत्सव (Parthiv Ganeshotsav) म्हणून ओळखला जातो. पार्थिव म्हणजे माती पासून बनवलेला गणपती. यामुळे या उत्सवासाठी लागणारी मूर्ती ही शेतातील मातीचीच असावी. शाडू (Shadu Ganesh Idol), प्लास्टर ऑफ पॅरिस (Plaster Of Paris Ganesh Idol) अथवा धातूची नसावी.

‘गौरी’ चे आगमन कधी ?

गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर गृहिणींना गौरी (Gauri Festival) आगमनाचे वेध लागतात. शनिवारी (दि. 03 सप्टेंबर) अनुराधा नक्षत्र (Anuradha Nakshatra) दिवसभर असल्याने दिवसभरात आपल्या सवडीनुसार केव्हाही गौरी आवाहन करता येईल. ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ही असलेल्या दिवशी पूजन करावे. रविवारी (दि. 04 सप्टेंबर) नेहमीप्रमाणे गौरी पूजन (Gauri Poojan) करावे. सोमवारी मूळ नक्षत्रावर रात्री 08 वाजून 06 मिनिटांपर्यंत केव्हाही गौरी आणि गणपतीचे विसर्जन करता येईल.

गणपती बाप्पा…! यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात, निर्बंधातून मुक्तता

See also  चिथावणीखोर ‘सातवी पास भाऊ'ची न्यायालयात माफी; 'या' तारखे पर्यंत पोलीस कोठडी

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Today’s Horoscope : 'असा' असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन, शुक्रवार, दि. 02 सप्टेंबर 2022

Share on Social Sites