
…तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय; फडणवीसांनाही होती कल्पना?
मुंबई l Mumbai :
राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. त्यांना भाजपाचा पाठिंबा देईल. या सरकारला माझे समर्थन असेल अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
पुन्हा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री; राज्यात ‘शिंदे सरकार’
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होती. या युतीच्या माध्यमातून भाजपानं 105 जागा आणि शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. जवळपास 161 युती आणि अपक्ष मिळून 170 बहुमत आमच्याकडे होते. भाजपा-शिवसेना युतीचं (BJP-Shiv Sena alliance) सरकार तयार होईल. त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपाचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणा केली होती. परंतु दुर्दैवाने त्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शिवसेना आणि त्यांचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला.
https://twitter.com/uddhavthackeray/status/1542561389298044930
विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांचा विरोध केला अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपाला बाहेर ठेवले. हा खरेतर जनमताचा अपमान होता. जनतेचा कौल भाजपा-शिवसेनेला होता. परंतु त्याचा अपमान करून महाविकास आघाडी अस्तित्वात आली.
https://twitter.com/ANI/status/1542464341521608705
तसेच गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची नवीन विकास योजना नाही. भ्रष्टाचारात 2 मंत्री जेलमध्ये जाणे. एकीकडे मा. बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे त्याच्याशी संबंध ठेवलेल्या मंत्र्यांला पाठिशी घातले. दररोज सावरकरांचा अपमान, हिंदुत्वाचा तिरस्कार झाला. जोपर्यंत विश्वासदर्शक ठराव समंत केल्याशिवाय कॅबिनेट घेता येत नाही. ते प्रस्ताव मंजूर केले. ते वैध मानले जाणार नाहीत. पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्हाला तो निर्णय घ्यावाच लागणार आहे असंही फडणवीसांनी सांगितले.
https://twitter.com/ANI/status/1542464779222405120
रोज अपमान होत असेल तर कशाच्या भरवशावर आम्ही लढायचं. ज्यांना आपण हरवलं त्यांना निधी देण्याचं काम केले जात होते. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तोडा, आम्ही त्यांच्यासोबत राहायला तयार नाही अशी भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली. परंतु दुर्देवाने उद्धव ठाकरेंनी आमदारांपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीला शेवटपर्यंत धरून ठेवले. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर पर्यायी सरकार देणे गरजेचे होते.
देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेची पत्रकार परिषद थेट राजभवनातून LIVE
सरकार पडलं तर आम्ही पर्यायी सरकार देऊ असं वारंवार आम्ही सांगत होतो. लोकांवर निवडणुका लादणार नाही. भाजपा-शिंदे गटाचे आमदार आणि 16 अपक्ष, घटक पक्षांचे आमदार आमच्यासोबत आले आहेत.
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1542519319338549248
आणखी काही आमदार आमच्यासोबत येत आहे. आम्ही सत्तेच्या पाठिशी नाही. कुठल्यातरी मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही काम करत नाही. ही तत्वाची, हिंदुत्वाची आणि विचारांची लढाई आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देईल.
निसर्ग कोपला रं! भूस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त; 55 जवान ढिगाऱ्याखाली अडकले, मृतांचा आकडा 7 वर