
नाशिक l Nashik :
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात (Yeola Taluka) धक्कादायक घटना घडली आहे. येथे हॉटेलमधील वेटर्समध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचा मृत्यू (Murder) झाला आहे.
या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण नाशिक जिल्हा (Nashik District) हादरला आहे. पोलिसांनी या प्रकरणात चार जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला अधिक तपास केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार येवला तालुक्यातील नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील (Nashik-Aurangabad highway) अंदरसुल गावा (Andarsul village) जवळ स्वामीज् हॉटेल (Swamij Hotel) आहे. या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटर्समध्ये सुरुवातील आपापसात वाद झाला होता.
त्याचेच पर्यावसान थेट जबर हाणामारीत झाले. वेटर्समध्ये सुरु झालेल्या या हाणामारीमध्ये एका चाळीस वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. मारहाणीमध्ये जखमी झाल्यामुळे या कामगाराला आपला जीव गमवावा लागला आहे.