
नाशिक l Nashik :
जिल्ह्यातील चांदवड (Chandwad) येथील ड्रायफ्रूट व्यावसायिकाची गुजरात (राजकोट) (Gujarat) (Rajkot) मधील व्यापाऱ्याने तब्बल ९ लाख ११ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याबाबत चांदवड पोलिस ठाण्यात (Chandwad Police Station) त्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदवड येथील व्यापारी संदिप पद्माकर शिरसाठ यांचा ड्रायफ्रूटचा (Dried fruit trader) व्यवसाय असून ते विविध ठिकाणाहून वेगवेगळ्या कंपनीचे ड्रायफ्रूट माल मागवून विक्री करतात. गुजरात येथील व्यापारी जितेंद्र छगन परमार (राजकोट, गुजरात) यांनी काजू व बदाम मालाचे एकूण १९ लाख ५३ हजार ५०० रुपयांची शिरसाठ यांच्याकडे ऑनलाईन मागणी केली.
त्यापोटी ७ टन काजू (Cashew N uts) व ४ टन बदाम (Almonds) असा ड्रायफ्रूटचा माल शिरसाठ यांना येणार होता. मात्र व्यापाऱ्याने केवळ २ टन काजू व ४७५ किलो बदाम असा एकूण ८ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा माल पाठवला.