राजधानीत आगडोंब! 27 लोक जिवंत जळाले, आगीच्या ज्वाळांनी आयुष्य बेचिराख; अनेक अजूनही बेपत्ता

राजधानीत आगडोंब! 27 लोक जिवंत जळाले, आगीच्या ज्वाळांनी आयुष्य बेचिराख; अनेक अजूनही बेपत्ता l Delhi Mundka fire 27 killed fire more than 50 rescued
राजधानीत आगडोंब! 27 लोक जिवंत जळाले, आगीच्या ज्वाळांनी आयुष्य बेचिराख; अनेक अजूनही बेपत्ता l Delhi Mundka fire 27 killed fire more than 50 rescued
Share on Social Sites

नवी दिल्ली l New Delhi :

दिल्लीच्या मुंडवा मेट्रो स्थानकाजवळ काल शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी चार मजली व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली. आगीच्या तडाख्यात सापडून तब्बल 27 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंभीर भाजलेल्या 12 जणांना रुग्णालयात दाखल केले आहे.

महागाईचा भोंगा! मोडला ‘इतक्या’ वर्षांचा रेकॉर्ड; सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या

अग्निशमन दल (Fire Brigade) आणि पोलिसांनी 50 हून अधिक नागरिकांना वाचवले. या इमारतीत अनेक कंपन्यांची गोदामे आहेत. येथे सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera), राउटर (Router), वायफाय (Wi-Fi) आदींची निर्मिती-जोडणीची कामे केली जातात. इमारतीत जाण्या-येण्यासाठी एकच दरवाजा आहे. आग दरवाजाजवळच लागली.

त्यामुळे अडकलेल्या लोकांना बाहेर पडता आले नाही. काहींनी खिडक्यांतून उड्या मारल्या. घटनेबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (President Ramnath Kovind) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

मृतांची संख्या वाढण्याची भीती…

पहिल्या मजल्यावरील सीसीटीव्ही कॅमेरा व राउटर तयार करणाऱ्या कंपनीतून आग सुरू झाली. रात्री उशिरापर्यंत अनेक बेपत्ता होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. पहिल्या मजल्यांवर 27 मृतदेह आढळले. तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर 10 ते 15 जण अडकले असल्याची भीती व्यक्त आहे.

कारणाचा शोध सुरू

बचाव कार्या दरम्यान अडकलेल्या लोकांना दोर आणि क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. इमारतीमधील धूर बाहेर काढण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी खिडक्यांच्या काचाही फोडल्या. मृतांमध्ये किती महिला आणि किती पुरुष आहेत हे स्पष्ट झाले नव्हते. इमारतीत आग कशाने लागली याचा तपास सुरू आहे.

दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू : खान्देशातील दुर्दैवी घटना

See also  'इस' मामले में NIA कोर्ट ने 4 को फासीं की सजा सुनाई, जानें बाकी 5 का क्या हुआ..

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites