
मुंबई | Mumbai :
निवडणूक आयोगाच्या (Election Commission) आदेशानुसार आज (दि. 29) शुक्रवारी राज्यातील महानगरपालिकेमधील ओबीसी आरक्षण (OBC reservation) जाहीर करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Local body Elections) ओबीसी राजकीय आरक्षणाला मंजुरी दिल्यामुळे ओबीसींसाठी आरक्षित जागांसाठी सोडतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यापूर्वी ओबीसी आरक्षणाविना सोडत काढली गेली मात्र, न्यायालयाच्या निर्णयानुसार आज पुन्हा ओबीसी आरक्षणासहीत सोडत काढली गेली. या सोडतीत शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) व भाजप (BJP) या प्रमुख पक्षांच्या अनेक दिग्गजांना धक्के बसलेत तर काहींना दिलासाही मिळालाय. पण या आरक्षण सोडतीनंतर अकोला महापालिकेच्या (Akola Municipal Corporation) राजकीय रणधुमाळीला सुरूवात झाली.
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात इतर मागासवर्गिय आरक्षणानुसार निवडणुका घेण्यास परवानगी दिल्यामुळे आता नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये मुंबई (Mumbai), पुणे (Pune), पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad), सोलापूर (Solapur), अकोला (Akola) आणि कोल्हापूर (Kolhapur) सह मोठ्या महानगर पालिकांचा यामध्ये सहभाग आहे. पाहूयात कोणत्या महानगरपालिकेत काय स्थिती आहे…
https://twitter.com/Legal_bites/status/1552995620159311873
मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) :
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election 2022) आरक्षण सोडत (Ward Reservation) जाहीर करण्यात येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा ओबीसी आरक्षण (OBC reservation) सोडत काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आज ही प्रक्रिया पार पडत आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आता एससी (SC) आणि एसटी (ST) प्रवर्गाचे आरक्षण वगळता, यापूर्वी जाहीर करण्यात आलेले सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण रद्द करुन, नव्याने ओबीसी आणि महिला सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण काढण्यात आले.
पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) :
पुणे महानगरपालिकेच्या (Pune municipal corporation elections 2022) सार्वत्रिक निवडणुकीकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणानुसार ही आरक्षण सोडत झाली आहे. पुण्यात एकून 58 प्रभाग आहेत. या प्रभागातील 173 जागांसाठी असणारी सोडल आज पार पडली. यावेळी पालिकेचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. या सोडतीमध्ये एकून 87 जागेसाठी महिला आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
https://twitter.com/MirrorNow/status/1552558097348136962
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) :
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग खुला केला. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने 2022 च्या (Pimpri Chinchwad municipal corporation elections 2022) निवडणूक आरक्षणाची नव्यानं सोडत केली. न्यायालयाच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवडमधील 139 पैकी 37 जागा या ओबीसींना आरक्षित करण्यात आला. म्हणूनच आजच्या सोडतीकडे सर्व साधारण गटाचे ही लक्ष होते. आगामी निवडणूक लढण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या सर्व साधारण गटातील अनेक पतींनी देव पाण्यात ठेवले होते. अपेक्षेनुसार सोडतीनंतर अनेक विद्यमान नगरसेवकांना फटका ही बसलाय.
नाशिक महानगर पालिका (Nashik municipal corporation elections 2022) :
सर्वांचे लक्ष लागून असलेल्या तसेच तब्बल दीड वर्षांपासून घोळत असलेल्या नाशिक (Nashik) महापालिकेच्या निवडणुकांसाठी (Nashik municipal corporation elections) यापूर्वीच्या सोडतीत बदल करून आता ओबीसी आरक्षण (OBC Reservation) सोडतसह सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण (Nashik Women Reservation) सोडत काढण्यात आली आहे. ओबीसींच्या 35 तर सर्वसाधारण महिला गटासाठी ही 35 जागांची सोडत काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आरक्षणासाठी सोडतीची प्रक्रिया राबविण्यात आली.
नवी मुंबई मनपा (Navi Mumbai Ward Reservation) :
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये नागरिकांच्या ओबीसी प्रभाग आरक्षण सोडत नवी मुंबई मनपामार्फत जाहीर करण्यात आली. शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. महानगरपालिकेची यावेळची निवडणूक एकूण 122 जागांसाठी होणार आहे. यामध्ये ओबीसीसाठी 25 जागा आरक्षित करण्यात आल्या असून यातील 13 महिला तर 12 पुरुष ओबीसी असणार आहेत. ही निवडणूक बहुसदस्यीय पद्धतीने होणार असल्याने पडलेल्या आरक्षणाचा फटका कुणालाही बसलेला नाही. पुरुष किंवा महिला यापैकी कुणीही असलेल्या नगरसेवकांच्या घरातील एक प्रतिनिधीला निवडणूक लढता येणार आहे.
सोलापूर महानगरपालिका (Solapur Municipal Corporation) :
सोलापूर महानगरपालिकेची मागील आरक्षण सोडत रद्द करून पुन्हा एकदा नव्याने आरक्षण सोडत पार पडली. सोलापूर महानगरपालिकेत एकूण 113 जागांवर निवडणूक होणार आहे. यापैकी 30 जागा या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असणार आहेत. तर अनुसूचित जातींसाठी 16 आणि अनुसूचित जमातींसाठी दोन जागा राखीव असणार आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivli Municipal Corporation) :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या येत्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 27 टक्के निकषानुसार आज ओबीसी आणि महिलांसाठीचे आरक्षण सोडत काढण्यात आली. (Kalyan Dombivali Ward Reservation) कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे (Kalyan Dombivali Municipal Commissioner Dr. Bhausaheb Dandage) यांच्या अध्यक्षतेखाली कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात (Acharya Atre Rangmandir, Kalyan) ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. कल्याण डोंबिवली महापालिकेची यंदाची निवडणूक प्रथमच पॅनल पद्धतीने होत आहे. यासाठी एकूण 44 प्रभागात 133 लोकप्रतनिधी निवडून येणार असून त्यामध्ये 50 टक्के म्हणजे 67 महिला लोक प्रतिनिधी असणार आहेत. त्यातही अनुसूचित जाती प्रवर्गामधून 13 (पैकी 7 महिला), अनुसूचित जमाती 4 (पैकी 2 महिला) नागरिकांचा मागास प्रवर्गमधून 35 (पैकी 18 महिला) तर उर्वरित म्हणजेच सर्वसाधारण प्रवर्गातून 81 (पैकी 40 महिला) लोक प्रतिनिधी निवडून येणार आहेत.
अकोला महानगरपालिका (Akola municipal corporation elections 2022) :
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिल्याने अकोला महापालिका निवडणुकीत ओबीसींच्या जागांसाठी आज आरक्षण सोडत पार पडली. यापूर्वी महिलांसाठी (खुला प्रवर्ग) आरक्षित केलेल्या 37 जागा रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. ओबीसींसाठी 24 जागा आरक्षित केल्या गेल्याआहेत. त्यापैकी 12 जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur municipal corporation elections 2022) :
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली. ओबीसी प्रवर्गासाठी 22 जागा (यामधील महिलांसाठी 11 जागा) व सर्वसाधारण महिलांसाठी 29 जागांसाठी केशवराव भोसले नाट्यगृहात सोडत काढण्यात आली.
नागपूर महानगरपालिका (Nagpur municipal corporation elections 2022) :
आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण असले तरी महापालिका सभागृहात महिला नगरसेवकांची संख्या अर्ध्याहून अधिक राहणार असल्याने मनपात महिलांचाच दबदबा राहणार असल्याचे दिसते. आज शुक्रवारी महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन (Shrimant Raje Raghuji Bhosle Nagar Bhavan) (टाऊन हॉल) येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण सोडत झाली. आरक्षणामुळे 79 महिलांना संधी मिळणार आहे.