शरद पवार हाय हाय… एसटी कर्मचाऱ्यांची ‘सिल्व्हर ओक’वर चप्पलफेक; सुप्रिया सुळेंना घेराव

शरद पवार हाय हाय... एसटी कर्मचाऱ्यांची 'सिल्व्हर ओक'वर चप्पलफेक; सुप्रिया सुळेंना घेराव l ST employees attack on NCP Sharad Pawar's Silver Oak home Mumbai
शरद पवार हाय हाय... एसटी कर्मचाऱ्यांची 'सिल्व्हर ओक'वर चप्पलफेक; सुप्रिया सुळेंना घेराव l ST employees attack on NCP Sharad Pawar's Silver Oak home Mumbai
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP president Sharad Pawar) यांच्या ‘सिल्वर ओक’ (Silver Oak) या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी यावेळी सिल्वर ओकच्या गेटमधून आत येत जोरदार निदर्शनं करण्यास सुरुवात केली.

यात घरावर चप्पली फेकण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी अचानक सिल्वर ओक गाठल्याचे लक्षात येताच खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) देखील आंदोलक कर्मचाऱ्यांशी बोलायला पोहोचल्या. पण कर्मचाऱ्यांचा संताप काही कमी झालेला नाही.

एसटी कर्मचाऱ्यांशी आता या क्षणाला मी बोलायला तयार आहे. पण त्यांनी शांत राहावं, असं वारंवार आवाहन सुप्रिया सुळे करत होत्या. अनेकदा विनंती करुनही एसटी कर्मचारी काही शांत होत नसल्याचं दिसून आलं. दरम्यान, शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त कमी होता.

त्यामुळे पोलिसांचीही दमछाक होताना दिसत आहे. घटनास्थळावरील परिस्थिती चिघळत असल्याचं दिसून येताच मुंबईचे पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील (Mumbai Deputy Commissioner of Police (Law and Order) Vishwas Nangre Patil) देखील तातडीने ‘सिल्वर ओक’च्या बाहेर पोहोचले आहेत.

असा जॉब पुन्हा नाही! Antarctica वर पाच महिने घालवण्याची संधी; Penguin मोजायचे काम

सुप्रिया सुळे यांना यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. “एसटी कर्मचाऱ्यांशी मी बोलायला तयार आहे. त्यांनी शांत राहावं. मी या क्षणाला त्यांच्याशी बोलते. माझे आई, माझे वडील आणि मुलगी घरात आहे. मला त्यांना भेटून येऊ द्यात. ते सुरक्षित आहेत का याची चौकशी करुन येऊ द्यात मी लगेच तुमच्याशी बोलायला येते. पण तुम्ही शांत व्हा”, असं आवाहन सुप्रिया सुळे वारंवार करत होत्या.

🚍 ST संपाचा तिढा अखेर सुटला!; हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश

See also  Video : बाईकला ट्रॅक्टरचा सायलेंसर, नंबर प्लेटच्या जागी “बोल देना पाल साहब आये थे” लिहून माज करत होते; मग पोलिसांनी असा शिकवला धडा की...

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  SMBT कॉलेज बसला भीषण अपघात; २२ हुन अधिक विद्यार्थी जखमी

Share on Social Sites