…तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय; फडणवीसांनाही होती कल्पना?

...तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय; फडणवीसांनाही होती कल्पना? l Maharashtra Politics decision was taken to give post of Chief Minister to Eknath Shinde Fadnavis lso have an idea
...तेव्हाच झाला होता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय; फडणवीसांनाही होती कल्पना? l Maharashtra Politics decision was taken to give post of Chief Minister to Eknath Shinde Fadnavis lso have an idea
Share on Social Sites

नवी दिल्ली l New Delhi :

गेल्या 10 दिवसांत महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) घडलेल्या धक्कादायक घडामोडीनंतर अखेर काल संध्याकाळी एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपाने देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी न सोपवता एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याने आणि सरकारमध्ये सहभागी होणार नाही म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पक्षश्रेष्ठींनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास भाग पाडल्याने आता त्याचीच चर्चा अधिक सुरू आहे.

https://twitter.com/RajThackeray/status/1542519365203279872

मात्र गुरुवारी (दि. 30) दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली असली तरी शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय आधीच झाला होता, अशी माहिती समोर येत आहे.

https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1542519319338549248

काल दुपारी एकनाथ शिंदे मुंबईत (Mumbai) आल्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी राज्यपालांकडे जात सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आणि भाजपा त्यांना पाठिंबा देईल, अशी घोषणा केल्याने सर्वांनाच धक्का बसला होता.

‘आज पहिल्यांदा माझा चेहरा पडलेला कारण..’ सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा साधला संवाद; मांडले हे 3 मुद्दे

मात्र आपण सरकारमध्ये आपण सहभागी होणार नाही, असे फडणवीस म्हणाले होते. पण पक्षश्रेष्ठींनी दबाव आणल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले.

https://twitter.com/narendramodi/status/1542522235340017665

See also  गंगाधरन डी नाशिकचे नवे जिल्हाधिकारी; सुरज मांढरे यांची बदली

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय हा दोन दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत (Delhi) बोलावले होते. तेव्हा हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच हे सर्व नियोजित कार्यक्रमानुसार घडले होते.

https://twitter.com/AmitShah/status/1542536207489703936

दरम्यान, शपथग्रहण सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र असं काही नसेल असं विधान शिंदे गटामधील बंडखोर आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलं आहे. ते म्हणाले की, मी देवेंद्र फडणवीस यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो.

https://twitter.com/OfficeofUT/status/1542538623303979008

ते एवढे कुशल आहेत की, ते कुठल्याही पदावर काम करतील. देवेंद्र फडणवीस राज्यासाठी एका संपत्तीसारखे आहेत. जर ते त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या योजनांच्या पूर्ततेसाठी मंत्रालयात असतील तर तो एक चांगला निर्णय आहे, असे केसरकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेची पत्रकार परिषद थेट राजभवनातून LIVE

दरम्यान, काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा सुरू असतानाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP national president J. P. Nadda) यांनी माध्यमांशी संवाद साधत आणि ट्विट करत फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचे आदेश दिले होते. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनीही असेच ट्विट केले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणे फडणवीस यांना भाग पडले.

पुन्हा ट्विस्ट! देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री; राज्यात ‘शिंदे सरकार’

See also  धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून पिडीतेचा १० वर्षे लैंगिक छळ, तीनवेळा गर्भपात

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Ahmedabad Serial Blast Case : एक तासात २१ स्फोट घडवले, इतिहासात पहिल्यांदाच ३८ जणांना फाशी

Share on Social Sites