महंगाई डायन… सिलेंडरच्या दरात विक्रमी वाढ, किंमत पोहोचली 1000 रुपयांच्या पार, पाहा नवे दर

महंगाई डायन... सिलेंडरच्या दरात विक्रमी वाढ, किंमत पोहोचली 1000 रुपयांच्या पार, पाहा नवे दर l Domestic LPG cylinder costlier by Rs 3.50, commercial cylinder hiked by Rs 8, Check rates here
महंगाई डायन... सिलेंडरच्या दरात विक्रमी वाढ, किंमत पोहोचली 1000 रुपयांच्या पार, पाहा नवे दर l Domestic LPG cylinder costlier by Rs 3.50, commercial cylinder hiked by Rs 8, Check rates here
Share on Social Sites

नवी दिल्ली l New Delhi :

महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांचं कंबरडे मोडले असतानाच आता पुन्हा एक मोठा झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ (LPG Cylinder Price Hike) केली आहे. या दरवाढीमुळे आता भारतात घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1000 रुपयांच्या पार (Domestic LPG Cylinder is above 1000 rupees) पोहोचला आहे. त्यासोबतच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे. (LPG Cylinders price hike check Mumbai, Delhi, Kolkata rates)

सिलेंडरचा दर तब्बल 1000 रुपयांच्या पुढे

आज (दि. 19) घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 3 रुपये 50 पैसे इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे भारतात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव 1000 रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. या दरवाढीमुळे आजपासून 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत दिल्ली आणि मुंबईत (Mumbai) 1003 रुपये, कोलकात्यात (Kolkata) 1029 रुपये, चेन्नईत (Chennai) 1018.5 रुपये इतका झाला आहे. (LPG Cylinders price hike Domestic Cylinder costlier by RS 3.50 per kilogram, Now price is above 1000 Rupees Check new rates)

या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. यापूर्वी (दि. 7) मे रोजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली आहे.

देशातील प्रमुख शहरांतील घरगुती LPG Cylinder ची किंमत (वजन 14.2 किलो)

दिल्ली (Delhi) – 1003 रुपये प्रति सिलेंडर

मुंबई (Mumbai) – 1002.50 रुपये प्रति सिलेंडर

कोलकाता (Kolkata) – 1029 रुपये प्रति सिलेंडर

चेन्नई (Chennai) – 1018.50 रुपये प्रति सिलेंडर

दे दणा दण! हायप्रोफाईल शाळेच्या विद्यार्थिनींमध्ये ‘फ्री’ स्टाईल राडा, पाहा व्हिडीओ

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरही महागला (Commercial LPG Cylinders are also expensive)

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरासोबतच व्यवावसायिक गॅस सिलेंडरच्या दरातही 8 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून 19 किलो गॅस सिलेंडरचा दर दिल्लीत 2354 रुपये, कोलकात्यात 2454 रुपये, मुंबईत 2306 रुपये आणि चेन्नईत 2507 रुपये इतके मोजावे लागणार आहेत. यापूर्वी दि. 7 मे रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 10 रुपयांनी कपात करण्यात आली होती.

तर दि. 1 मे रोजी यामध्ये तब्बल 100 रुपयांची वाढ झाली होती. त्याचवेळी मार्च महिन्यात दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 2012 रुपये इतकी होती. दि. 1 एप्रिलला 2253 रुपये इतका दर होता तर दि. 1 मे रोजी हा दर 2355 रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षभरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 750 रुपयांनी वाढ झाली आहे.

मध्य प्रदेशात OBC आरक्षणाचा मार्ग मोकळा; ‘सुप्रीम’ निर्णयाचा महाराष्ट्रालाही फायदा?

19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत किती? (How much does a 19 kg commercial cylinder cost?)

दिल्ली – 2354 रुपये प्रति सिलेंडर

मुंबई – 2306 रुपये प्रति सिलेंडर

कोलकाता – 2454 रुपये प्रति सिलेंडर

चेन्नई – 2507 रुपये प्रति सिलेंडर

See also  जिथं भोंगे, तिथं हनुमान चालिसा; राज ठाकरे भूमिकेवर ठाम : उद्यासाठी मनसे सैनिकांना पत्रातून दिले 'हे' आदेश

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites