मुंबई l Mumbai :
महागाईचे सर्वसामान्यांना झटक्यावर झटके बसणे सुरू झाले आहे. गेल्या एप्रिलमध्ये खाद्यपदार्थांपासून (Food) ते तेलाच्या (Oil) वाढत्या किमतींमुळे महागाईने 8 वर्षातील उच्चांक गाठला आहे. काल गुरुवारी (दि. 12) जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer Price Index (CPI) आधारित किरकोळ महागाई मार्चमध्ये वाढून 8.79 टक्के झाली आहे. खाद्यपदार्थांची महागाई 8.38 टक्के झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. (Inflation reaches at peak point in last 8 years)
दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू : खान्देशातील दुर्दैवी घटना
रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India RBI)आर्थिक वर्षाच्या पहिल्या पतधोरण बैठकीनंतर पहिल्या तिमाहीत महागाईचा अंदाज 6.3%, दुसऱ्या 5%, तिसऱ्या 5.4 आणि चौथ्या तिमाहीत 5.1% इतका वाढवला होता.
मात्र, त्यानंतरही महागाई नियंत्रणात येत नसल्याने आणीबाणीची बैठक बोलवत रेपो दरात (Rapo Rate) 0.40 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सलग चौथ्या महिन्यात महागाई दराने रिझर्व्ह बँकेने घालून दिलेली 6 टक्केची मर्यादा ओलांडली आहे.
Inflation hits 7.79% – highest since India (according to sanghis) got independence in 2014.
Markets are plummeting. Food & fuel prices at all time high.
Worst is yet to come.
The Modi govt must convene an all-party meet & EXPLAIN what they’re doing to control this.
— Saket Gokhale (@SaketGokhale) May 12, 2022
लोकांची खरेदी थांबली (People stopped buying)
वाढलेल्या महागाईचा भारतातील लोकांच्या खरेदीच्या निर्णयावर परिणाम झाल्याचे ‘ईवाय’ (EY) ने जारी केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. 80% भारतीय हातातील रक्कम खर्च करण्याऐवजी बचत करण्यावर भर देत असून, केवळ परवडणाऱ्या वस्तू खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.
https://twitter.com/nehanagarr/status/1524965190508240896
औद्योगिक उत्पादनात किरकोळ वाढ (A slight increase in industrial production)
देशातील औद्योगिक उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत 1.9 टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये ही वाढ 1.7 टक्के होती. ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी प्रचंड कमी झाली असून, या क्षेत्रात नकारात्मक वाढ दिसून आली आहे. औद्योगिक उत्पादनात वाढ झाली असली तरी उत्पादन क्षेत्रात मात्र केवळ 0.9 टक्के वाढ झाली आहे.
अमेरिकेतही 40 वर्षांचा उच्चांक (40-year high in US)
महागाईचा फटका सध्या जगभर जाणवत असून, अमेरिकेत गेल्या 7 महिन्यांपासून महागाई रोज नवीन उच्चांक गाठत आहे.
नवीन आकडेवारीनुसार, अमेरिकेतील महागाई 40 वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. येथे महागाईचा दर 8.3 टक्क्यांवर पोहोचला आहे.
यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; महाराष्ट्रातील पाचजण जागीच ठार, 2 गंभीर
