
मुंबई l Mumbai :
गेल्या तब्बल दोन वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेकांनी यामुळे आपले प्राण गमावले आहे. भारतातही तिसरी लाट (Corona Third Wave) येऊन गेली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातही कोरोना पूर्णपणे नाहीसा झाला आहे असे काहीसे चित्र आहे.
MPSC Main Examination : महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 मुलाखतीच्या तारखा जाहीर
याच पार्श्वभूमीवर राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये काही शाळा आणि कॉलेजेसही ऑफलाईन (Offline Colleges in Maharashtra) पद्धतीने सुरु झाले आहे. मात्र अजूनही राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस (University Campus starting offline classes in Maharashtra) सुरु करण्यात आले नव्हते. मात्र आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे.
राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे (Universities), महाविद्यालयातील (High Schools) विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन (Offline classes in University campus) पद्धतीने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच ट्विट (Uday Samant Twit) करून दिली आहे. त्यामुळे आता गेल्या दोन वर्षांपासून ओस पडलेले युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा गजबजणार आहे.
https://twitter.com/samant_uday/status/1511693386687819785
सर्व युनिव्हर्सिटी कॅम्पस आणि त्या अंतर्गत येणारे कॉलेजेस आणि विद्यापीठे बंद होते. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला असून नियमही हटवण्यात आले आहे. म्हणूनच आता सर्व युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्याचे आदेश सामंत यांनी दिले आहे.
चिंता वाढली! भारतात Corona च्या नव्या व्हेरिअंटची एन्ट्री, मुंबईत XE आणि कप्पाची पहिली केस
सामंत यांनी राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालय ऑफलाईन सुरु राहणार या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून आणि कोरोना प्रतिबंधक उपाय योजना पाळून राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालय पुन्हा सुरु करावीत असा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर राष्ट्रवादीची भाजपसोबत युती?, शरद पवारांनी दिल ‘हे’ स्पष्टीकरण
नेमकं काय आहे निर्णय
ज्या विद्यार्थ्यांचे कोरोना लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोज घेऊन झाले आहे अशा विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ऑफलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे. मात्र ज्यांनी अजूनही कोरोना प्रतिबंधक लस घेतली नाही अशा विद्यार्थ्यांना उपस्थित राह्ता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात येणार आहे अशीही माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली आहे.
VAT कमी केल्याचा दिलासा पाच दिवस टिकला, CNG, PNG त ‘इतक्या’ रुपयांची दरवाढ