राज्यात मास्कमुक्ती झाली हो!

राज्यात मास्कमुक्ती झाली हो! l Maharashtra government mask mandatory restrictions removed
राज्यात मास्कमुक्ती झाली हो! l Maharashtra government mask mandatory restrictions removed
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

कोरोना महासाथीचे थैमान अद्यापही पूर्णतः संपलेले नाही. पण तरी परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर कोरोना निर्बंधही हळूहळू शिथील करण्यात आले (Maharashtra New Corona Guidelines).

परंतु चेहऱ्यावरील नकोसा मास्क काही हटला नाही. काही प्रमाणात सूट देण्यात आली तरी मास्क बंधनकारक होते (Mask mandatory rules in Maharashtra). त्यामुळे या मास्कपासून सुटका कधी मिळणार असेच सर्वांना वाटत होते. अखेर तो दिवस आला आहे. गुढीपाडव्याआधी राज्यातून (Maharashtra State Government) मास्कमुक्ती झाली आहे.

गुढीपाडव्याआधी ठाकरे सरकारने (Thackeray Government) मोठा निर्णय घेतला आहे. नागरिकांची मास्कमुळे होणारी कोंडीही सोडवली आहे. नागरिकांना मास्क फ्री करून राज्य सरकारने नागरिकांना नववर्षाचे सर्वात मोठे गिफ्ट दिले आहे.

नवाब मलिकांच्या मालमत्तेसंदर्भात नाशकात ईडीची धाड

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून राज्यात सण-उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. पण आता कोरोना आटोक्यात आला असून राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे हे निर्बंध मागे हटवण्याची मागणी करण्यात येत होती.

अखेर आज राज्य मंत्रिमंडळाने आगामी काळात येणारे सण-उत्सव साजरे करण्यावर कुठलेही निर्बंध नसल्याचे जाहीर केले आहे. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

https://twitter.com/SanjayJog7/status/1509508282477875201

See also  Video : अभी तो पार्टी शुरू हुई हैं... देशवासियांच्या दुःखाचा पाढा वाचून मोदींवर निशाणा साधणारे राहुल गांधी बारमध्ये 'ति'च्या सोबत 'स्पॉट'

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले, “आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले राज्यातील सर्व निर्बंध हटवण्यात आले आहे. आता मास्कही बंधनकारक नाही पण ऐच्छिक आहे. याचा अर्थ आता मास्क वापरणे बंधनकारक नाही. मास्क ऐच्छिक आहे”. म्हणजे मास्क वापरायचा की नाही हे तुमच्या हातात आहे. मास्क वापरण्यासाठी तुमच्यावर कोणतीही जबरदस्ती नाही. (Mask use guidelines in Maharashtra)

मिळालेल्या माहितीनुसार, हे निर्बंध उद्यापासून हटवण्यात येणार आहेत. उद्यापासून हे निर्बंध हटवण्यात आल्याने दि. 2 एप्रिल 2022 रोजी येणारा गुढीपाडवा यंदा उत्साहात, आनंदात तसेच शोभायात्रा काढून साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उद्यापासून काय-काय बदलणार? (What will change from tomorrow?)

  • कोरोनाचे सर्व निर्बंध हटणार

  • दोन वर्षे लागू असलेले कोरोनाचे निर्बंध संपुष्टात येणार

  • गुढीपाडवा शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान उत्साह साजरा करता येणार

  • मास्क सक्‍ती नसेल, मास्क लावणे ऐच्छिक असेल

  • हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थितीवर मर्यादा नाही

  • लग्‍न किंवा कौटुंबिक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा नाही

  • बस, लोकल आणि रेल्वेने प्रवास करताना लशीचे प्रमाणपत्र आवश्यक नाही

  • सार्वजनिक ठिकाणे, मॉल, बगीचे याठिकाणी मास्क वापरणे किंवा लशीचे प्रमाणपत्र धाखवण्याची गरज भासणार नाही

  • सर्वधर्मीयांचे सर्व उत्सव निर्बंधमुक्‍त असतील, यात्रा-जत्रा धुमधडाक्यात होणार

  • निर्बंधामुळे उद्योग-व्यवसायांवर आलेली बंधने हटणार

28 ची नवरी, 41 चा नवरदेव, दोघात 13 वर्षाचं अंतर जास्त नाही?, IAS Tina Dabi ने सांगितली त्रिसूत्री

See also  “नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले…” : अमृता फडणवीसांनी शेअर केला '१०० मार्कांचा पेपर’; म्हणाल्या...

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  खळबळजनक! YCMOU च्या ऑनलाईन परीक्षेत डमी विद्यार्थ्यांचा ‘मुक्‍त’ सहभाग; तब्बल 2500 विद्यार्थ्यांचे चेहरे 'मिसमॅच'

Share on Social Sites